मुंबई: ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावरून लवकरच पायउतार होणार आहेत. त्यानंतर ट्विटरचे (Twitter)मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) पराग अग्रवाल (Parag Agarwal)यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे कंपनीने सोमवारी जाहीर केले आहे.
पराग अग्रवाल हे आयआयटी, मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. ते २०११पासून कंपनीच्या सेवेत आहेत. २०१७ मध्ये त्यांची कंपनीचे ‘सीटीओ’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. जॅक डॉर्सी(Jack Dorsey) सीईओपदाचा राजीनामा दिला असले तरी कंपनीच्या संचालक मंडळावर मुदत संपेपर्यंत म्हणजे २०२२ पर्यंत राहणार आहेत. यावरच अग्रवाल जग आपल्याकडे पूर्वीपेक्षाही अधिक अपेक्षेने पाहत आहे. आपण ती अपेक्षापूर्ती करूया, असे ट्वीट अग्रवाल यांनी केले आहे.
दरम्यान पराग अग्रवाल यांच्या नियुक्तीवरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. जागतिक तंत्रज्ञानविषयक कंपन्यांच्या ‘सीईओ’पदी अनेक भारतीय विराजमान आहेत. त्यातच आता पराग अग्रवाल यांची ट्वीटरच्या ‘सीईओ’पदी नियुक्ती झाली आहे. मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, गुगलचे सुंदर पिचई, ‘आयबीएम’चे अरविंद कृष्ण, ‘अॅडोब’चे शंतनू नारायण यांच्यापाठोपाठ अग्रवाल यांचेही नाव या यादीत आता समाविष्ट झाले आहे.ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याच्या प्रतिक्रिया आता समाज माध्यमावर उमटत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- शशी थरूर यांच्या ‘त्या’ ट्वीटचा मिमी चक्रवर्तींकडून बचाव; म्हणाल्या..
- …या साथीची उत्पत्ती भारतात झाल्याचा आम्हाला अभिमान आहे- आनंद महिंद्रा
- ‘…याचा मला पश्चात्ताप आहे’, अजित पवारांसोबतच्या ‘त्या’ शपथविधीविषयी फडणवीसांचे वक्तव्य
- IPL मधील टीम कायम राखण्यात येणाऱ्या खेळाडूंचा आज करणार फैसला
- भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका अनिर्णीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

