मुंबई: तृणमुल काँग्रेसच्या (TMC) अध्यक्ष ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आजपासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी पक्षाच्या विस्तारात व्यस्त आहेत. दिल्लीतही त्यांनी अनेक काँग्रेस नेत्यांची भेट घेतली आहे. आपल्या पक्षाला पुढे नेत, ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या पक्षाच्या घटनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून सुकाणू समितीमध्ये इतर राज्यातील नेत्यांचा समावेश करता येईल.
ममता बॅनर्जी यांच्या दक्षिण कोलकाता येथील निवासस्थानी झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत अन्य राज्यांमध्ये पक्षाचा प्रवेश वाढवण्यासाठी घटनेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी पक्ष विस्ताराचा कार्यक्रम सुरू ठेवणार असून विविध राज्यांचा दौरा करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार त्या महाराष्ट्रात (Maharashtra) येणार असल्याचे माहिती त्यांनी दिली आहे.
तृणमूल काँग्रेसने भाजपशासित राज्यांमध्ये निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. देश पातळीवर एक मजबूत विरोधी पक्ष उभा करण्याचा विरोधी पक्षांचा विचार आहे, त्यानुसार हे राजकीय समीकरण आखणं सुरू असल्याचं स्पष्ट होत आहे. ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसांच्या मुंबई (Mumbai) दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशिवाय त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचीही भेट घेणार आहेत. ममता बॅनर्जी १ डिसेंबर रोजी मुंबईत उद्योगपतींना भेटतील आणि त्यांना पुढील वर्षी एप्रिलमध्ये होणाऱ्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिटसाठी आमंत्रित करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘खोटं बोल पण रेटून बोल हेच ठाकरे सरकारचे धोरण!’
- शशी थरूर यांच्या ‘त्या’ ट्वीटचा मिमी चक्रवर्तींकडून बचाव; म्हणाल्या..
- …या साथीची उत्पत्ती भारतात झाल्याचा आम्हाला अभिमान आहे- आनंद महिंद्रा
- IPL मधील टीम कायम राखण्यात येणाऱ्या खेळाडूंचा आज करणार फैसला
- ‘…याचा मला पश्चात्ताप आहे’, अजित पवारांसोबतच्या ‘त्या’ शपथविधीविषयी फडणवीसांचे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

