मुंबई : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) त्याच्या लूकमुळे सोशल मीडियावर (social media)
सतत चर्चेत असतो. फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमाने चाहत्यांशी संवाद असतो. नुकतच जडेजा ‘पुष्पा’ (Pushpa) चित्रपटातील हटके लुकमध्ये दिसला असून अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) भूमिकेचे रिक्रिएशन पाहून अल्लू अर्जुनने पोस्टवर प्रतिक्रिया देखील दिली आहे.
दरम्यान रवींद्र जडेजाने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपटातील फोटो शेअर केला आहे. त्यासोबतच त्याने स्वत:चा पुष्पाच्या लूकमधील देखील फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने तेलुगूमध्ये ‘पुष्पाचा अर्थ तुम्ही फूल असं समजलात का? इथे त्याचा अर्थ आग असा आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. जडेजाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चर्चेत आहे. त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. अल्लू अर्जुनने देखील जडेजाच्या या फोटोवर तेलुगूमध्ये कमेंट केली आहे. अल्लू अर्जुनने त्यासोबतच आगीचे इमोजी वापरले आहेत.
https://www.instagram.com/p/CYoIXM4MaRD/?utm_source=ig_web_copy_link
Pushpa ante Flower anukunnava
Fireuuuu????P.S- Smoking and consumption of tobacco is injurious to health. I do not endorse any form of smoking and the beedi used in the image is for graphic purposes only. pic.twitter.com/yykAlGLLwb
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) January 12, 2022
रवींद्र जडेजाने पोस्टमध्ये एक सामाजिक संदेशही दिला आहे. जडेजाच्या नव्या लूकमध्ये पुष्पा हुबेहुब अल्लू अर्जुन या चित्रपटाच्या हिरोसारखी दिसत आहे. तो अभिनेत्याप्रमाणे बिडी ओढताना दिसत आहे. या पोस्टमध्ये पुष्पाने चित्रपटाचा एक संवादही लिहिला आहे. यासोबतच जडेजाने सामाजिक संदेशही दिला आहे. तो म्हणाला की हा फक्त एक ग्राफिकल फोटो आहे. सिगारेट, विडी आणि तंबाखू आरोग्यासाठी हानिकारक आहेत. त्यांच्यामुळे कर्करोग होतो. त्यांच्यापासून दूर राहा.
‘पुष्पा : ज राइज’ हा चित्रपट लाल चंदनाच्या तस्करीवर आधारित आहे. ज्यात अभिनेता अल्लू अर्जुननं ‘पुष्पा’ ही व्यक्तीरेखा साकारली आहे. याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदानाचीही मुख्य भूमिका आहे. सध्या सोशल मीडियावरील खेळाडू रवींद्र जडेजाने शेअर केलेल्या फोटोवर जोरदार चर्चा होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- अनिल देशमुखांच्या शंभर कोटी बाबत पोलिस उपायुक्तांनीच दिले उत्तर, म्हणाले…
- कोरोनामुक्त होताच रोहित पवार मैदानात; साधला भाजपवर निशाणा
- ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’चे सुनिल मेहता यांचे निधन
- “आपल्याला कोरोना झाला नाही कारण…”; इंदुरीकर महाराजांचे अजब विधान
- अजय देवगणने स्वतःला लिहिलं पत्र ; म्हणाला, “अभिनेता म्हणून अपयशी..”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

