मुंबई : भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्य सरकारच्या बेफिकीरमुळेच मराठा आरक्षण रद्द झाल्याची घणाघाती टीका यावेळी राणे यांनी केली आहे.
राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मराठा आरक्षण मिळालं ते मान्यही झालं आणि टिकलंही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नव्हतं. त्यामुळं योग्य पद्धतीनं बाजू मांडली नाही, असा आरोप नारायण राणे केला आहे. तसंच मराठ्यांनी आता राज्य सरकारला कारभार करता येणार नाही, असं तीव्र आंदोलन करावं असं आपलं मत असल्याचंही नारायण राणे म्हणाले.
नारायण राणे यांनी मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवरून शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला. ‘सर्वोच्च न्यायालयानं मागितलेलं स्पष्टीकरण का दिलं नाही? सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध होईल यासाठी काळजडी का घेतली नाही? प्रख्यात वकील का उभे केले नाही?’ असे सवाल नारायण राणे यांनी केले. या मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नव्हतं असा आरोप त्यांनी केला. लवकर मराठा आरक्षण दिलं नाही तर उपस्थित होणाऱ्या स्थितीला सरकार जबाबदार असेल. राज्यात सरकारला सरकार चालवणं कठीण व्हावं अस आंदोलन मराठ्यांनी करावं अशा मताचा मी आहे, असंही राणे यावेळी म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादेतील कठोर निर्बंध १ जूनपासून शिथिल करा! आ.चव्हाण यांची ठाकरेंकडे मागणी
- ‘महाविकास आघाडीकडून मराठा समाज आणि ओबीसींत भांडणं लावण्याचा प्रयत्न’
- पुण्यात आज रुग्णसंख्येत मोठी घट ! दुसऱ्या लाटेची स्थिती आटोक्यात येण्यास सुरुवात
- आजपासून ३ जूनपर्यंत राज्यात वादळी वाऱ्यासह बरसणार मान्सूनपूर्व पावसाच्या सरी
- लॉकडाऊन काळात एसटीचे २२ कोटींचे नुकसान!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

