औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून शहराचा ‘पॉझिटिव्हिटी रेट’ फक्त २ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत लागू करण्यात आलेले कठोर निर्बंध १ जूनपासून शिथिल करावेत अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आ.सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुसर्या लाटेत कोरानाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्यात पुन्हा अत्यावश्यक सेवा वगळता ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत ३१ मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र १ जूनपासून लॉकडाऊन पुन्हा वाढवला जाणार का? यावरून व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक व सर्व सामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्यात राबवलेले ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ यासह अन्य यशस्वीपणे राबविलेल्या मोहिमा व त्याला नागरिकांनी दिलेला उत्तम प्रतिसाद यामुळे आपण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात यशस्वी झालो.
मात्र हे करत असताना मागील दोन महिन्यांपासून राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद आहेत. त्यामुळे व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांचे आर्थिक गणित कोलमडले असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे. कमाई काहीच नाही परंतु त्यांचा दुकानाचे भाडे, वीज बील, कर भरण्यासह अन्य खर्च सुरूच आहेत. त्यामुळे कोरोनाविषयक नियमांचे पालन करून आम्हाला दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी व्यापार्यांबरोबरच तिथे काम करणार्या कर्मचार्यांकडून केली जात आहे.
हातावर पोट असणार्या नागरिकांना लॉकडाऊनमुळे काम नसल्याने त्यांचे देखील प्रचंड हाल होत आहेत. रोजगार नसल्याने आम्ही जगायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत लागू करण्यात आलेले कठोर निर्बंध १ जूनपासून शिथिल करावेत अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना काळातही मुंबईची गती आणि विकासाचा वेग मंदावला नाही – उद्धव ठाकरे
- ‘महाविकास आघाडीकडून मराठा समाज आणि ओबीसींत भांडणं लावण्याचा प्रयत्न’
- पुण्यात आज रुग्णसंख्येत मोठी घट ! दुसऱ्या लाटेची स्थिती आटोक्यात येण्यास सुरुवात
- आजपासून ३ जूनपर्यंत राज्यात वादळी वाऱ्यासह बरसणार मान्सूनपूर्व पावसाच्या सरी
- लॉकडाऊन काळात एसटीचे २२ कोटींचे नुकसान!


