पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला आहे. मार्च पासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत गेल्याने आरोग्य सेवेवर प्रचंड ताण निर्माण झाला होता. यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आलेख हा उतरता असल्याचं दिसून येत आहे.
पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान. पुणे शहरात एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सात हजार रुग्णांची वाढ होत होती. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यासाठी देखील ही बाब गंभीर होती. मात्र, आता कोरोना रुग्णांच्या आकड्यात मोठी घट होत असून कोरोना बाधितांची संख्या देखील अधिक आहे.
पुणे शहरात गेले काही दिवस दररोज नव्या रुग्णांची संख्या १ हजारांच्या आत नोंदवली जात आहे. तर, कोरोनाबाधितांची संख्या ही अधिक आहे. यामुळे सक्रिय (ऍक्टिव्ह) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे. आज पुणे शहरात १८० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, ७५१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यामुळे आता ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ हजार २० इतकी झाली असून ८३३ रुग्ण हे गंभीर आहेत. तर, १ हजार ५८१ रुग्ण हे ऑक्सिजनच्या साहाय्याने उपचार घेत आहेत. दरम्यान, आज कोरोनामुळे २४ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
#दिलासा | दुसऱ्या लाटेतील सर्वांधिक कमी रुग्णांची नोंद !
■ नवे रुग्ण : १८०
■ डिस्चार्ज : ७५१
■ चाचण्या : ४,४३९सक्षमपणे लढू, कोरोनाला हरवू !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 31, 2021
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ जून पर्यंत निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी ज्या शहरांमध्ये (१० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिका) आणि जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट हा १० टक्क्यांच्या खाली असेल त्यांना अधिक शिथिलता देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा १० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने पुणेकरांना निर्बंधांमध्ये सूट मिळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- अनलॉकला सुरुवात : ‘या’ जिल्ह्यात सलून, कपड्याचे दुकान, सराफ दुकानं उद्यापासून सुरू होणार !
- वाढदिवसाची पार्टी केल्याने पोलिसांकडून सरप्राईझ! जमावासह ‘बर्थ डे बॉय’वर गुन्हा
- ‘विनायक मेटेंचा विरोध केवळ आमदारकी मिळवण्यासाठी’, अशोक चव्हाणांची टीका
- भाजप आमदार महेश लांडगेंना डान्स पडला महागात ; ६० जणांवर गुन्हा दाखल
- ‘ठाकरे सरकारच्या बेफिकिरीमुळे ओबीसी आरक्षण गमावले’, माजी मंत्री बावनकुळे यांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

