🕒 1 min read
पुणे : पुणे मेट्रोवरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादाची लढाई रंगल्याचे दिसून आले. गेल्याच आठवड्यात उपमपख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित पुणे मेट्रोची ट्रायल रन पार पडली होती. मात्र यासाठी आमंत्रणच नसल्याचे भाजपकडून आरोप करण्यात आला होता. तर, मेट्रोमध्ये कोणाचा किती वाटा यावरून स्थानिक नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले.
या वादावर आज उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोना स्थितीची आढावा बैठक झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘साधेपणाने मर्यादित लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम करायचा होता. म्हणून पुणे मेट्रोच्या ट्रायल रनचे उद्घाटन सकाळी सात वाजत झाले. ही फक्त ट्रायल रन होती. आता ट्रायलला पण भडकता की काय ?,’ असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
पुढे ते म्हणाले, ‘एकदा सुरुवात करायची होती. कार्यक्रम झाला की त्याला प्रसिद्धी मिळते. लोकांना कुठपर्यंत काम झालं त्याची माहिती मिळते. ते स्वत: व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होतेच. शहराचे प्रथम नागरिक होते. काही इतर आमदार होते. मर्यादित लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम घ्यायचा होता. म्हणून तो सकाळी सातला ठेवला.’
‘ट्रायल रन’ कोणाच्याही हस्ते होऊ द्या, उद्घाटन हे पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार – फडणवीस
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रोची ‘ट्रायल रन’ कोणाच्याही हस्ते होऊ द्या, मात्र, उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्तेच होणार असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. महामेट्रोच्या कामाची पाहणी करण्यासाठी शिवाजीनगर येथील मेट्रोच्या नियोजित स्थानकावर देवेंद्र फडणवीस यांनी काल (शनिवारी) भेट दिली. यावेळी ते म्हणाले, ‘महामेट्रोच्या ‘ट्रायल रन’ चे उद्घाटन राज्याचे उपमुखमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले यात काही गैर नाही. ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. मात्र या मेट्रोत केंद्र सरकारचा मोठा वाटा आहे. त्यामुळे मेट्रोचे काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे अशीच आम्हा सर्वांची इच्छा आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मराठा गोष्टी सांगत नाही, तर तो इतिहास रचतो’; मुख्यमंत्री ठाकरेंचा नीरजच्या कुटुंबियांना फोन
- अखेर पुणेकरांची मागणी मान्य; सर्व दुकाने व सेवा रात्री ८ पर्यंत सुरु, तर शनिवार-रविवारी…
- मराठा क्रांती मोर्चाची पाच वर्षे; छत्रपती संभाजीराजेंच्या उपस्थितीत साजरा होणार वर्धापनदिन!
- आरटीई प्रवेश प्रक्रियेत बेकायदेशीरपणे प्रवेश होत असल्यास चौकशी व्हावी; पालक संघाची मागणी!
- विमानतळ विस्तारीकरणाची जमिन घ्या; अन्यथा आरक्षण हटवा, कृती समितीची मागणी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
