🕒 1 min read
नागपूर : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा ‘सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग कायदा २०१८’ बुधवारी रद्दबातल ठरवला. ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचे समर्थन करणारी कोणतीही असामान्य परिस्थिती दिसत नसल्याने हे आरक्षण घटनाबाह्य असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. यामुळे मराठा समाजाने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, आता मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. ‘मराठा आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल 15 दिवसात येईल. अहवाल आल्यावर पुढे जाऊ,’ असं भाष्य विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- नानांनी कचराच करून टाकला; बघूया शिवसेनेची किती औकात उरलीये – राणे
- ‘सोलापूरकरांवर अन्याय झाला तर राजकारणातून संन्याय घेईल, आमदारकीचाही राजीनामा देईल’
- मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याची काँग्रेस-राष्ट्रवादीने पायाभरणी केली – घाटगे
- ‘माझ्याकडे नवरा आहे…’; ट्विंकलने युजरला दिले गमतीशीर उत्तर
- कोल्हापूरात येत्या २ दिवसात कडक लॉकडाऊन लावणार : हसन मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
