Share

कोल्हापूरात येत्या २ दिवसात कडक लॉकडाऊन लावणार : हसन मुश्रीफ

Published On: 

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेल्यांची व मृत्यू होणाऱ्यांची संख्या उच्चांकावर पोहोचल्याने जिल्ह्यात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात येत्या दोन दिवसात कडक लॉकडाऊन करण्यात येईल अशी माहिती राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापूरमध्ये दिली आहे.

सध्या कोल्हापुर जिल्ह्यात सर्वात जास्त कोरोनाचा मृत्यूदर आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोल्हापुरची परिस्थिती बिघडत झाली आहे. देशातील सर्वात जास्त मृत्यूदर कोल्हापुरात आहे. गेल्या ७ ते ८ दिवसांपासून मृत्यूदर कसा कमी होईल, याचा प्रयत्न केला जात आहे. पण आता कडकडीत लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. १० ते १४ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात येणार असून यामध्ये दूध आणि मेडिकल सोडून सर्व काही बंद राहिला. येत्या २ दिवसांत जिल्ह्याधिकाऱ्यांशी बैठक घेऊन अंतिम घोषणा केली जाईल, अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.

वैदयकीय क्षेत्र आणि सर्व अत्यावश्यक सेवा वगळता कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. जिल्यातील मृत्युदराचाही संख्या वाढत आहे, विशेषतः तरुणाच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय जिल्ह्यात ऑक्सिजनचा साठा अपुरा आहे, औषधांचा साठा अपुरा आहे, ऑक्सिजन बेड , व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाहीत, यामुळे जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्याशिवाय गत्यंतर नाही, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.

खरेतर दोन दिवसापूर्वीच कडक लॉकडाऊन करण्यात येणार होता, परंतु गोकुळच्या निवडणुकीच्या तोंडावर ती घोषणा केल्याने नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टीका केली, वास्तविक त्याच दिवशी सातारा, सांगली, आणि बारामती या जिल्ह्यातही कडक लॉकडाऊनची घोषणा केली होती, परंतु तेथे गोकुळची निवडणूक न्हवती, असे मत मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!