🕒 1 min read
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह सचिवांकडे विविध पुरावे सादर केल्याने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोन आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी टॅप केला होता असा आरोप करण्यात येत आहे. त्यांनी फोन टॅपिंग करून फडणवीसांना मदत केल्याचा आरोप देखील महाविकास आघाडीतील नेते करत आहेत.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील सत्ता स्थापनेच्या घडामोडींवेळी शिरोळचे अपक्ष आमदार व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांना भाजप सोबतच राहण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी धमकावल्याचा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
‘शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडी मध्ये न जाता भाजपा बरोबर राहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखिल प्रयत्न केला होता. अजून पुरावे काय पाहिजेत,’ असं आव्हाड म्हणाले आहेत.
दरम्यान, जितेंद्र आव्हाडांच्या या आरोपांनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रश्मी शुक्ला अप्रत्यक्षपणे पाठराखण केली आहे. ‘मला आव्हाडांचं वक्तव्य म्हणजे राजेंद्र यड्रावकर यांचे अवमूल्यन वाटते. कुठलाही आमदार-नेता अशाप्रकारे दबावाला बळी पडत नसतो. एवढा कमकुवत लोकप्रतिनिधी नसतो. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या बोलण्यात तथ्य वाटत नाही,’ असं भाष्य दरेकर यांनी केलं आहे. तसेच, सरकार चौकशीची इतकी घाई का करत आहे? शुक्लांवरच दबाव आणला जातोय, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘युपीएच्या कॅप्टन बदलावर १६ वा गडी बोलतोय, त्याला काही अर्थ नाही’
- मला बॅटिंग करायला मजा येते आणि बॉलिंगही थेट स्टम्प्सवर करतो; फडणवीसांची फटकेबाजी
- वाझेंचा देशपातळीवरील मोठा गुन्हा; एनआयएने आणखी १५ दिवसांची कोठडी मागितली
- अध्यक्षपदाबाबत बोलण्याचा राऊतांना अधिकार नाही, सेनेनं आधी यूपीएचा भाग व्हावं – सावंत
- आता राज्यव्यापी लॉकडाऊन करता येणार नाही, मात्र…केंद्र सरकारची नवी नियमावली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
