Share

विश्वास नांगरे पाटलांसाठी मराठा क्रांती युवा मोर्चा आक्रमक, कारवाईची मागणी

Published On: 

🕒 1 min read

जालना : महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यावर आरोप केले होते. विश्वास पाटील हे महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र, आयपीएस अधिकारी नांगरे पाटील यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या किरीट सोमय्या यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मराठा क्रांती युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात जालना पोलीस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनामध्ये मराठा क्रांती युवा मोर्चाच्या वतीने किरीट सोमय्या यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘महाराष्ट्रातील लाखो युवती-युवकांचे प्रेरणास्थान असणारे, जो अधिकारी जीवाची पर्वा न करता राष्ट्राच्या संरक्षणासाठी अतिरेक्याविरुद्ध लढला. त्याचा उत्कृष्ट पोलीस अधिकारी म्हणून शासनाने सन्मान केला. त्यांच्याबद्दल बद्दल अपशब्द काढणारे किरीट सोमय्या यांचा आम्ही निषेध करतो.’

किरीट सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्यात आले होते. त्यावेळी कायद्याचा भंग करुन त्यांना थांबवण्यात आले असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणात त्यांच्यावर नांगरे पाटील यांनी चूकीची कारवाई केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!