🕒 1 min read
औरंगाबाद : मराठा आरक्षणाबाबत येत्या 25 जानेवारीपासून दैनंदिन स्तरावर नियमित सुनावणी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीत जाहीर केले होते. त्यानुसार राज्य सरकार आपल्या रणनीतीवर अंतिम हात फिरवत असून, आजवर झालेल्या तयारीची समीक्षा केली जात आहे. दरम्यान, मराठा आरक्षणावर वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलंय. समाजातील गरीब मराठा समाज, जोपर्यंत बंड करणार नाही तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही’, असे आंबेडकर म्हणाले. औरंगाबादेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकविण्यात राज्य सरकारला अपयश आले. त्यामुळे आता ५० टक्क्यांच्या आत मराठा समाजाला ओबीसीत स्वतंत्र वर्गवारी करून आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, मराठा समाजाला मिळालेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात कायम व्हावे यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे हे आरक्षण टिकविण्यासाठी अग्रक्रम दिला पाहिजे. आताच ओबीसी वर्गात समाविष्ट करण्याची मागणी करू नये, अशी भूमिका शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी घेतली.
२५ जानेवारीपासून सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार आहे. न्यायालयात एसईबीसीचे आरक्षण कोणत्याही परिस्थितीत सरकारला टिकवावे लागेल. मात्र राज्य सरकार आणि वकील हे मराठा आरक्षणांवरील स्थगिती उठविण्यास अपयशी ठरले तर ओबीसी प्रवर्गात स्वतंत्र वर्गवारी करून न्या. गायकवाड आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत ओबीसी समूहात आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडेंचा वारसदार कोण ? पहिल्या पत्नीची मुलगी की करुणा शर्मांचा मुलगा ?
- फडणवीस आणि माझ्यात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका; पाटलांचा पवारांना इशारा
- शरद पवारांनी नैतिकता पाळत चौकशी होईपर्यंत मुंडेंचा राजीनामा घ्यावा- चंद्रकांत पाटील
- मुस्लिम समाजाला सोबत घेत प्रकाश आंबेडकर करणार आंदोलन
- ‘पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री ठाकरे यांनी लस टोचून घेतल्यानंतरच मी लस टोचून घेईन’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
