Share

सासूचा खून करून फरार असलेला जावई अखेर पोलिसांच्या ताब्यात

Published On: 

🕒 1 min read

बीड: एप्रिल महिन्याच्या २५ तारखेला केज-कळंब रस्त्यावर जावयाने सासूवर कोयत्याने हल्ला करून तिचा निर्घुण खून केला असल्याची खळबळजनक घटना घडली होती. या घटनेनंतर आरोपी जावाई फरार होता. पत्नीला नांदायला पाठवण्यावरून हा वाद झाला होता आणि अखेर जावयाने सासूचा खून केला होता. त्यानंतर जावाई तेथून पळून गेला होता, मात्र पोलिसांनी त्या जावयाला तब्बल २२ दिवसांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

साळेगाव येथील अमोल वैजनाथ इंगळे याने पत्नीस नांदण्यास का पाठवले नाही या रागातून भेटण्यासाठी आलेल्या धायगुडा पिंपळा (ता. अंबाजोगाई) येथील सासू लोचना धायगुडे व त्यांचा पुतण्या अंकुश धायगुडे यांच्या डोळ्यात चटणी टाकून कोयत्याने हल्ला केल्याची घटना २५ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजेदरम्यान केज-कळंब रस्त्यावरील संताजी हॉटेलजवळ घडली होती. या हल्ल्यात सासू लोचना धायगुडे यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर पुतण्या अंकुश धायगुडे जखमी झाला होता.

या घटनेनंतर अमोल इंगळे हा फरार झाला होता. तर त्याच्यासोबत असलेला त्याचा पुतण्या बंटी उर्फ प्रशांत बबन इंगळे याला पोलिसांनी अटक केली होती. अमोल इंगळे हा अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे नातेवाईकांकडे शेतात असल्याची गुप्त माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत, पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनात पथकाने १८ मे रोजी सकाळी ७ वाजता सापळा रचून अमोल इंगळे झोपेत असतानाच त्याला अटक केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!