मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियांसह शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षणावर देखील टाच आली आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी तब्बल १२ हजार ५०० पदांसाठी पोलीस भरती करण्यात येईल अशी घोषणा केल्यानंतर मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियांसह शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षणावर देखील टाच आली आहे. यानंतर राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यातील विविध जिल्ह्यात आंदोलन व निदर्शनं केली जात आहेत.
आज नाशिकमध्ये मराठा आंदोलकांनी भुजबळांच्या फार्म हाऊस बाहेर आंदोलन केलं. आंदोलकांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देण्यासाठी गर्दी केली होती. मात्र भुजबळांची भेट न झाल्याने अखेर भुजबळ फार्मला निवेदन लावून परतण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. छगन भुजबळ मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करत आहेत, असा आरोप केला आहे. तर काही लोक जाणीवपूर्वक माझी प्रतिमा मराठा विरोधक अशी करण्याचे आहे, असा पलटवार भुजबळांनी केला आहे.
भुजबळ आपल्या नियोजित बैठकांसाठी बाहेर होते. त्यामुळे त्यांना येण्यास वेळ लागल्याने, आंदोलकांनी भुजबळ फार्मच्या गेटवरच निवेदन अडकवून काढता पाय घेतला. दरम्यान संतप्त झालेल्या आंदोलकांनी भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर, दुसरीकडे खासदार संभाजीराजे आणि उदयनराजे देखील आक्रमक झाले असून मराठा समाजाच्या पाठीशी आपण खंबीर पणे उभे असल्याचे सांगितले आहे. आता भुजबळांना खरंच वेळ नव्हता की त्यांनी या मुद्यापासून लांब राहणे पसंत केले आहे? यावर चर्चा रंगत असून आंदोलकांच्या आरोपामुळे चीड निर्माण होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ही तर मराठा समाजाच्या डोळ्यात धूळफेक’ ; राज्य सरकारला संभाजीराजेंचा तीव्र इशारा
- ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण
- मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही तोपर्यंत राज्यात कोणतीही भरती प्रक्रिया करू नये
- इंदुमिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यास माझा विरोध : प्रकाश आंबेडकरांचा गौप्य स्फोट
- पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतून मलकापूर नगरपालिकेला रुग्णवाहीका प्रदान


