Share

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण

Published On: 

कोल्हापूर : गेल्या काही दिवसात कोरोनाचा कहर अधिक वाढला आहे. राज्यात उच्चांकी रुग्णांची वाढ होत असतानाच राज्यातील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. स्थानिक लोकप्राधिनिधी, बॉलिवूड स्टार्स, ते केंद्रीय मंत्र्यांना देखील कोरोनाने विळखा घातला आहे.

आता राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

हसन मुश्रीफ यांनी, ” आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना माझी विनंती आहे की, खबरदारी म्हणून कोरोना चाचणी करावी. सर्वांनी काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे ” असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!