मुंबई : काल अचानक राज्य सरकारने इंदूमिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या पायभरणीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आणि नव्या वादाला तोंड फुटले आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून आंबेडकर चळवळीतील पक्षांमध्ये आणि नेत्यांमध्ये देखील नाराजी पसरली होती. तर, राज्याचा विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांना देखील आमंत्रण न दिल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील सरकारवर निशाणा साधला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (18 सप्टेंबर) दुपारी तीन वाजता पायाभरणी सोहळा होणार असल्याचं, काल सांगण्यात आलं होतं. मात्र एमएमआरडीएकडून आजचा कार्यक्रम रद्द झाल्याचं सांगण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला केवळ 16 जणच निमंत्रित होते, त्यावरुन नाराजीचा सूर उमटत होता. आता हा कार्यक्रमच पुढे ढकलण्यात आला आहे.
दुसऱ्याबाजूला एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज असलेल्या ऍड. प्रकाश आंबेडकरांनी मोठा गौप्य स्फोट केला आहे. “माझा पुतळा उभारण्याला विरोध आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. पुतळा उभारण्याऐवजी एक बौध्दीक विचार केंद्र निर्माण व्हावं अस मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. तसंच इंदू मिलमधील स्मारकाच्या कार्यक्रमाला जाण्यात मला रस नाही असंही त्यांनी म्हटलं.”
प्रकाश आंबेडकरांची न्यायालयाला विनंती!
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ही जागा इंटरनॅशनल स्कुल ऑफ स्टडीजसाठी दिली होती. या जागेबाबतच्या अटलजींच्या पत्राचं अध्ययन मुख्यमंत्र्यांनी करावं, असंही आंबेडकर म्हणाले. मात्र, इथल्या राजकारण्यांनी ही जागा पुतळ्यासाठी वापरली. त्यामुळे न्यायालयाला मी विनंती करतो की, त्यांनी पुतळयाचा आणि सुशोभीकरणाचा निधी वाडिया रुग्णालयासाठी वर्ग करण्याचा आदेश द्यावा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :-
- #Breaking_News : …तरच पुण्यात जमावबंदी ; पालकमंत्री अजित पवारांनी बैठकीत केला खुलासा
- ‘आम्ही उगाचच 30 वर्ष शिवसेनेच्या प्रेमात पडलो’ शहराच्या नामांतरावरुन ‘औरंगाबादकरांची’ प्रतिक्रिया
- शासनाचा गोंधळात गोंधळ; इंदुमिल पायाभरणी सोहळा रद्द झाल्याने खुद्द अजित पवारांना घ्यावी लागली माघार
- इंदुरीकर महाराजांना धक्का! ‘अंनिस’लाही मिळणार बाजू मांडण्याची संधी
- लहरी मोदी सरकारने कांद्यावरची निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

