मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियांसह शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षणावर देखील टाच आली आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी तब्बल १२ हजार ५०० पदांसाठी पोलीस भरती करण्यात येईल अशी घोषणा केल्यानंतर मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या वतावरणात भरतीची घोषणा ऐकून दुःखी झाल्याचं राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. कालच त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भरती स्थगिती करण्यास विनंती केली होती.
“५८ मोर्चाना सर्वच समाजाचा पाठींबा मिळाला होता. मात्र आता मराठा समाज व्यथित असताना आरक्षण स्थिर करण्याऐवजी अशी घोषणा करणे म्हणजे मराठा समाजाला एक प्रकारे चेतावणी दिली जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ही भरती पुढच्या टप्प्यात देखील घेतली जाऊ शकते, तर आत्ताच का घ्यायची आहे?” असा सवाल देखील राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र सरकारला केला आहे.
आता सरकार दरबारी या नाराजीवर गंभीर विचार केला जात आहे. एकूण १२ हजार ५२८ पोलीस पदांसाठी भरती होणार आहे. त्यापैकी १३ टक्के म्हणजेच १६०० जागा राखीव ठेवण्याचा विचार केला जात असल्याचे वृत्त सुत्रांच्या माहितीनुसार मिळत आहे. या जागा राखीव ठेवण्याच्या सरकारच्या तयारीला खासदार संभाजीराजे यांनी विरोध केला असून ही मराठा समाजाच्या डोळ्यात धूळफेक केली जाती आहे, असा आरोप देखील लावला आहे.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांची अधिकृत फेसबुक पोस्ट-
” ‘आधी आरक्षण आणि मगच भरती’! हीच मराठा समाजाची भूमिका आहे. मराठा समाजाच्या 13% जागा सोडून पोलीस भरती काढू, असं बोलणं म्हणजे समाजाच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा प्रकार आहे. म्हणजे सरकारला आरक्षणाचा मुद्दा निकाली काढायचा नाहीये का? अशी शंका लोकांना येत आहे. यापुढे कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती काढली जाऊ नये, मग ती पोलीस भरती असो की ‘एम पी एस सी’ ची किंवा आणखी कुठलीही परीक्षा असो मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय निकाली लागल्या शिवाय भरती नको.
मराठा समाज इतर कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय. इतर सर्व समाज मराठा समाजाच्या सोबत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजांनी सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाला सरकारने प्राधान्य द्यावं हीच भूमिका घेतली आहे. त्यांचे मी समाजाच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतो.
सरकारने पोलीस भरती चा निर्णय तात्काळ मागे घ्यावा. ही समाजाच्या वतीने विनंती वजा सूचना आहे.” असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपतींनी आज राज्य सरकारला दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- #Breaking_News : …तरच पुण्यात जमावबंदी ; पालकमंत्री अजित पवारांनी बैठकीत केला खुलासा
- ‘आम्ही उगाचच 30 वर्ष शिवसेनेच्या प्रेमात पडलो’ शहराच्या नामांतरावरुन ‘औरंगाबादकरांची’ प्रतिक्रिया
- शासनाचा गोंधळात गोंधळ; इंदुमिल पायाभरणी सोहळा रद्द झाल्याने खुद्द अजित पवारांना घ्यावी लागली माघार
- इंदुरीकर महाराजांना धक्का! ‘अंनिस’लाही मिळणार बाजू मांडण्याची संधी
- इंदुमिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यास माझा विरोध : प्रकाश आंबेडकरांचा गौप्य स्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

