Share

कॉंग्रेसच्या २८ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश; नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले…

Published On: 

मुंबई: मालेगाव महानगरपालिकेतील (Malegaon Municipal Corporation) काँग्रेसच्या सर्व २८ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मालेगावमधील काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख (former MLA Rashid Sheikh)आणि महापौर ताहिरा शेख (Mayor Tahira Sheikh) यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे. या सर्वांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे हा कॉंग्रेसला मोठा धक्का बसला असल्याचे म्हटले जात आहे. आता यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

जे काही चाललं आहे ते मंथनाचं काम सुरु आहे. त्यांचे लोक आमच्याकडे आणि आमचे लोक त्यांच्याकडे जात आहेत. आता त्यांनी आमचे थोडे नेले पण त्यांचे जास्त लोक आमच्याकडे येऊ लागले आहेत. हे चालणार आहे, नाराजी हा राजकारणातील भाग असतो. त्यामुळे हे फार गांभीर्यानं घेतलं नाही, तसेच राष्ट्रवादीमधून येणारे बरेच जण आहेत, पण गोपनीयता पाळावी लागते. जाहीर केलं तर ते अलर्ट होतील. जसं आम्हाला न विचारता काही गोष्टी ते करतात तसंच पुढच्या काळात करण्याची तयारी झाली असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

दरम्यान यावेळी अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी म्हटले की, “नाशिकचा विकास झाला, तसाच मालेगावच्या बाबतीत देखील समस्या सोडवण्याच्या दृष्टीने एकत्र बसून चर्चा करू. या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत येण्याचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे, आणि हे तुम्हाला कामातून सिद्ध करून दाखवू, अशी ग्वाही मी सर्व सहकाऱ्यांना देतो. अनेक प्रश्न निर्माण होणार आहेतच. पण त्यातून मार्ग काढण्याचे काम आपण करू”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!