मुंबई : वेस्ट इंडीज विरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये काही नवीन नावांची वर्णी लागली आहे. ज्यात दिपक हुड्डा याचाही समावेश आहे. दिपक हुड्डाच्या संघात सिलेक्शननंतर चर्चा मात्र कृणाल पंड्याचा नावाची होत आहे.
बुधवारी खेळाडूंची नावे जाहीर झाल्यानंतर ट्विटरवर ट्रेंडीगवर मात्र कृणालचे नाव होत होते. झाले असे कि कृणाल पंड्याच्या ट्विटर अकाऊंट विविध प्रकारचे विचित्र ट्वीट केले जात होते. काही वेळा नंतर लक्षात आले कि त्याचे अकाऊंट हॅक झाले होते. या काळात चाहत्यांनी मात्र ” दीपकच्या सिलेक्शन मुळे डोके फिरले आहे” ” दिपकनेच कृणालचे अकाऊंट हॅक केले आहे ” अशा मजेशीर कमेंट करायला सुरुवात केली.
Krunal Pandya drunk tweeting after yesterday's selections, fir bolega account was hacked.
— Mayank (@ImMayankB) January 27, 2022
https://twitter.com/Umakant_27/status/1486550812746604547?s=20
वडोदरा संघात सोबत खेळताना कृणाल पंड्या आणि दिपक हुड्डा यांच्यामध्ये काही वर्षांपूर्वी मोठा वाद झाला होता. ज्याचा संदर्भ घेत या दोघांमधील वैरामुळे कृणाल आता असे काही ट्वीट करत आहे असे नेटकार्यांना वाटले. दिपक हुड्डा भारतीय संघात पर्दापण करत आहे. तर कृणाल संघात पुन्हा जागा बनवण्यासाठी संघर्ष करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- आता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…
- ‘फक्त गोळी झाडू नका, बाकी…’, भाजप आमदाराचा कार्यकर्त्यांना सल्ला
- “हिंमत असेल तर एफआयआर दाखल करा”, किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान
- औरंगाबादचं संभाजीनगर करण जमलं नाही; संधीसाधू शिवसेना टीपू सुलतानचा उद्घोष करतेय-केशव उपाध्ये
- साऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

