Share

आई झालेल्या अनुष्का शर्माने प्रियंका चोप्राला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) गायक निक जोनस (Nick) यांनी काही दिवसांपूर्वी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली. यानंतर सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल प्रचंड चर्चा झाल्या. आता मात्र अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) पोस्टद्वारे प्रियांका एक मोलाचा सल्ला दिला आहे.

दरम्यान सरोगसीच्या मदतीने आई झाल्यानंतर प्रियांकावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. नुकतंच अभिनेत्री अनुष्का शर्माने सोशल मीडियावर (social media) पोस्ट करत प्रियांका आणि निकचे अभिनंदन केले आहे. त्यासोबत त्यांना एक सल्लाही दिला आहे. याबद्दल अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. याद्वारे तिने प्रियांका-निकचे अभिनंदन (Congratulating) केले आहे.

“प्रियांका आणि निक तुमचे खूप खूप अभिनंदन. आता ‘रात्री जागण्यासाठी तयार राहा’. त्यासोबतच भरपूर आनंद आणि प्रेमासाठी सज्ज व्हा. तुमच्या बाळाला खूप प्रेम,” असे अनुष्का म्हणाली. त्यासोबत अनुष्काने दोन हार्ट इमोजीही त्या पोस्टमध्ये लिहिले आहेत. या पोस्टवर चाहत्यांनी लाईक,कमेंट करीत आहेत. तसेच प्रियांका चोप्रानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून आई झाल्याची गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली. त्या दोघांनी ही पोस्ट करताना म्हटले की, ‘आम्ही सरोगसीच्याद्वारे बाळाचं स्वागत केलं आहे, हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे.

मिळालेल्या माहिती अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचं बाळ २७ व्या आठवड्यात जन्माला आलं आहे. बाळ आणि सरोगेट आई कॅलिफोर्नियाच्या एका रुग्णालयात आहेत. नियोजनानुसार बाळाचा जन्म एप्रिल महिन्यात होणार होता. मात्र त्या आधीच त्याचा जन्म झाल्यानं बाळाला रुग्णालयातच ठेवण्यात आलं आहे. काही दिवसांनी तिच्या घरी आणणार आहेत. यामुळे सर्वत्र बाळाबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!