मुंबई: सध्या भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या कार्यालयात जाऊन फाईल्स पाहिल्यामुळे वादात असून आता त्यांनी पत्रकार घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांना निशाण्यावर धरले आहे. जय पवार यांचे कारनामे मी लवकरच उघड करणार असल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे.
अजित पवार (NCP leader Ajit Pawar) यांची १०५५ कोटींची संपत्ती बेनामी घोषित झाली.आता पुढे काय होते ते पाहा. अजित पवार यांचा मुलगा जय पवार (Ajit Pawar’s son Jay Pawar) याने काय कारनामे केलेत, तेदेखील लवकरच बाहेर येतील, असेदेखील किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यातील घोटाळ्याबाबतीत अजित पवार यांच्यावर आरोप केले होते. बेनामी गुंतवणूक करून, कंपन्यांचे जाळे निर्माण करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची खरेदी केली. सर्व नियमांचे उल्लंघन करून पवार यांनी स्वत:च हा कारखाना स्वत:ला विकला, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले होते. आता आज पुन हा एकदा त्यांनी जय पवार याने काय कारनामे केलेत ते लवकरच उघड होईल, असे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- आता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…
- ‘फक्त गोळी झाडू नका, बाकी…’, भाजप आमदाराचा कार्यकर्त्यांना सल्ला
- “हिंमत असेल तर एफआयआर दाखल करा”, किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान
- औरंगाबादचं संभाजीनगर करण जमलं नाही; संधीसाधू शिवसेना टीपू सुलतानचा उद्घोष करतेय-केशव उपाध्ये
- साऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

