मालेगाव: निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी झाली असल्याचे चित्र दिसत आहेच त्यात आता कॉंग्रेसच्या तब्बल २७ नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मालेगावमधील काँग्रेसचे (Congress) सर्वेसर्वा माजी आमदार रशीद शेख हे पत्नी आणि महापौर ताहेरा शेख यांच्यासह सत्तावीस नगरसेवकांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेशी केला आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस असे तीन पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadhi Government) स्थापन झालं. यादरम्यान, या तीनही पक्षांमध्ये आघाडीचा धर्म पाळण्यासाठी आपल्या पक्षातील लोकांना आघाडी सरकारमधील इतर पक्षात प्रवेश देण्यात येऊ नये, असा अलिखित शाब्दिक करार करण्यात आला होता. मात्र तो कोणीही पाळत नसल्याचे दिसत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडी असली तरी प्रत्येकाला आपला पक्षाला वाढवण्याचा अधिकार आहे, यापूर्वीही आघाडीचे सरकार होते तेव्हा काँग्रेसचे लोक आमच्याकडे यायचे आमचे त्यांच्याकडे जायचे, त्यामुळे हे येणं जाणं सुरूच राहतं, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
“राहुल गांधी दिल्लीतील संजय राऊत”, पराग अग्रवाल यांना लिहिलेल्या पत्रावरून भातखळकरांचे टीकास्त्र
आता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…
‘फक्त गोळी झाडू नका, बाकी…’, भाजप आमदाराचा कार्यकर्त्यांना सल्ला
“हिंमत असेल तर एफआयआर दाखल करा”, किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान
औरंगाबादचं संभाजीनगर करण जमलं नाही; संधीसाधू शिवसेना टीपू सुलतानचा उद्घोष करतेय-केशव उपाध्ये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

