औरंगाबाद: शहरातील ऐतिहासिक समृद्धी आणि वारसा असलेल्या निजाम कालीन जुन्या दरवाजांची डागडुजी करण्यात यावी. त्याकाळी असलेले वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यात यावे. टाऊन हाॅल परिसरातील कमल तलाव विकसित करण्यात यावा व त्यास पर्यटन स्थळ घोषित करून सुशोभित करण्यात यावे. अशी मागणी औरंगाबाद काँग्रेस कमिटीतर्फे उच्च वैद्यकीय व सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख(Amit Deshmukh) यांना याबाबत मागण्यांचे निवेदन दिले आहे.
औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक दरवाजांची संपूर्ण डागडुजी करण्यात यावी जुन्या काळातील त्यांचे वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यात यावे. आत मधले निखळलेले लाकुड आणि लाकडांचे दरवाजे पुन्हा दुरुस्त करून किंवा त्या सारखे दिसणारे दरवाजे बसविण्यात यावे. पानचक्की ते बीबी का मकबरा व पुढे बौद्ध लेणी पर्यंत पर्यटन कॉरिडोर घोषित करून विकसित करण्यात यावा. जेणेकरून पर्यटनस्थळाला चालना मिळेल व खाम नदीच्या काठी पानचक्की ते मकई गेट एक नवीन रस्ता बांधावा. टाऊन हाॅल परिसरातील कमल तलाव विकसित करण्यात यावा व त्यास पर्यटन स्थळ घोषित करून सुशोभित करण्यात यावे. जेणेकरून औरंगाबाद शहराच्या मध्यभागी सर्व नागरिकांना एक चांगले पर्यटनस्थळ लाभेल.
सर्व नागरिकांना शुद्ध हवा मिळेल, तेथे वॉकिंग प्लाझा सुद्धा करण्यात यावा. त्यामुळे शहरात पर्यटन स्थळ विकसित होऊन वाव मिळेल. दौलताबाद किल्ल्याजवळील खुलताबादकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गेटमध्ये नेहमी वाहतूक ठप्प होते. मोठी वाहने गेटमध्ये अडकतात. त्यामुळे गेटच्या उजव्या बाजूने पर्यायी रस्ता बनविण्यात यावा. वरील मागण्या पुरातत्त्व विभागाच्या बैठकीमध्ये करण्यात आल्या. वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात झालेल्या बैठकीत प्रामुख्याने घाटीत रुग्णालयाच्या पाठीमागील मकई गेट कडील रस्त्यावर सुरक्षा गेट बसवुन ॲम्बुलन्स साठी सुरु करण्यात यावा ही मागणी करण्यात आली आहे. जेणेकरून त्या भागात राहणाऱ्या रहिवाशांना रुग्णांना त्वरित दवाखान्यात ने-आण करता येईल व त्यांचे उपचार लवकर सुरू होईल आदी मागण्यांसाठी
महत्त्वाच्या बातम्या
डॉ. अवचट यांच्या रूपाने संवेदनशील लेखक, सामाजिक कार्यकर्ता आपण गमावला- केशव उपाध्ये
“ट्विटरला मोहरा बनू देऊ नका…”, राहुल गांधींचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र
दुःखद! ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ.अनिल अवचट यांचे निधन
राज्य सरकार चालविण्याची जबाबदारीही केंद्र सरकारकडेच द्या- चंद्रकांत पाटील
ध्वजारोहणावेळी रश्मी आणि आदित्य ठाकरेंनी केला आचारसंहितेचा भंग; मुंबईत तक्रार दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

