मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात खळबळ माजवणाऱ्या मनसुख हिरेन खून प्रकरणातील गूढ उकलले असल्याची माहिती ATSचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी दिलेली आहे. लांडे यांनी एक फेसबुक पोस्ट करून त्यांनी ही माहिती दिलेली आहे.
अंबानी स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे.
एकीकडे राज्यात सचिन वाझेंना महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आदेश दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्याने खळबळ उडालेली असताना दुसरीकडे मनसुख हिरेन प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आलेला पोलीस विनायक शिंदे (५१) आणि बुकी असलेला नरेश गोर (३१) याला महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. त्यानंतर राज्याच्या एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी फेसबुक पोस्ट करून अत्यंत संवेदनशील मनसुख हिरेन खून प्रकरणातील गुंता सुटला असल्याची माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : मनसुख हिरेन खून प्रकरणातील गूढ उकलले ; ATSचे डीआयजी लांडे यांचा खुलासा
- साष्टपिंपळगाव आंदोलनकर्ते घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट
- नाचनवेलला फुलंब्री तालुक्यात जोडण्याची ग्रामस्थांची मागणी
- शिक्षकांना विमा सुरक्षा कवच देण्याची शिक्षक समितीची मागणी
- स्टेट बँकेने घेतले सिद्धार्थ उद्यानातील १४ वाघ दत्तक


