Share

मोठी बातमी : मनसुख हिरेन खून प्रकरणातील गूढ उकलले ; ATSचे डीआयजी लांडे यांचा खुलासा

Published On: 

मुंबई : अंबानी स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे.

परंतु आता मनसुख हिरेन खून प्रकरणातील गूढ उकलले असल्याची माहिती ATSचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी दिलेली आहे. लांडे यांनी एक फेसबुक पोस्ट करून त्यांनी ही माहिती दिलेली आहे.

या पोस्ट मध्ये ते म्हणतात कि, ‘अत्यंत संवेदनशील मनसुख हिरेन खून प्रकरणातील तिढा सुटला आहे. मी माझ्या एटीएस पोलिस दलाच्या सर्व सहकार्यांना मनापासून सलाम करतो, ज्यांनी या प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून रात्रंदिवस एक करून पूर्ण पद्धतीने न्याय दिला आहे. माझ्या पोलिस कारकीर्दीची आजपर्यंतची ही सर्वात जटिल घटना होती.’

https://www.facebook.com/shivdeeplandeofficial/posts/289814455834737

अशा आशयाची फेसबुक पोस्ट करून त्यांनी ही माहिती दिलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे हिरेन यांच्या मृत्यूनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव घेतलं जात असून या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

 

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!