Share

साष्टपिंपळगाव आंदोलनकर्ते घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

Published On: 

जालना : जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगाव येथे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ५ दिवसांपासून ग्रामस्थ व महिलांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत आंदोलनकर्त्यांची येत्या बुधवारी मुंबईत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन पालकमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी (दि. २०) दिल्यावर १२ जणांचे आमरण उपोषण मागे घेण्यात आले.

साष्टपिंपळगाव येथे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून ठिय्या आंदोलन सुरू असुन या आंदोलनाची दखल शासनाने घेऊन मराठा साष्टपिंपळगाव समाजाला आरक्षण लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी दिनांक १६ मार्च रोजी महिला-पुरुषांसह साष्टपिंपळगाव ते बारामती आरक्षण आक्रोश विनंती रॅली काढण्याचे आयोजन करण्यात आले.

परंतु बारामतीला निघण्यापूर्वीच येथील आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याने तेव्हापासून ९ महिला व ३ पुरुषांनी आमरण उपोषणास सुरुवात केली होती. मात्र यातील दोन जणांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आंदोलनकर्त्यांचे एक शिष्टमंडळ येत्या बुधवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सोबत वर्षा बंगल्यावर भेट घेऊन चर्चा करणार आहे. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचा खटला सुप्रीम कोर्टात सध्या सुरू असल्याने सुनावणी दरम्यान शासनाकडून न्यायालयात आपले काही प्रतिनिधी म्हणून उपस्थितीत परवानगी देण्यात येईल.

त्याचप्रमाणे मराठा समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी महाआघाडी सरकाराने अन्नासाहेब अर्थिक महामंडळाला १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून या महामंडळाचा अध्यक्ष निवडीसंदर्भात येत्या आठवडाभरात निर्णय घेऊन आजपर्यंत मराठा समाजासाठी जे काही चांगले आणि हिताचे निर्णय घेण्यात आले ते निर्णय मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या लेखी पत्राद्वारे कळवले जाणार असल्याचे यावेळी टोपे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!