Share

स्टेट बँकेने घेतले सिद्धार्थ उद्यानातील १४ वाघ दत्तक

Published On: 

औरंगाबाद : महापालिकेच्या प्राणी दत्तक योजनेला प्रतिसाद देत स्टेट बँक ऑफ इंडियाने प्राणिसंग्रहालयातील सर्व चौदा वाघ एक वर्षासाठी दत्तक घेतले आहेत. चौदा वाघांसाठी दहा लाख रुपयांच्या निधीचा धनादेश बँकेच्या अधिकाऱ्यांनी प्राणिसंग्रहालयाच्या संचालकांकडे शनिवारी (दि.२१) सुपूर्द केला.

सिद्धार्थ उद्यानात महापालिकेचे प्राणिसंग्रहालय आहे. प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांसाठी महापालिकेने दत्तक योजना जाहीर केली आहे. प्रामुख्याने वाघ, बिबट्या या प्राण्यांसाठी ही योजना आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने या योजनेला प्रतिसाद देऊन, प्राणिसंग्रहालयातील सर्वच्या सर्व चौदा वाघ एक वर्षासाठी दत्तक घेतले आहेत. त्यात तीन पांढऱ्या, तर ११ पिवळ्या वाघांचा समावेश आहे.

प्राणिसंग्रहालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात वाघांसाठीचा निधी देण्यात आला. या वेळी खासदार इम्तियाज जलील, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य विभागीय अधिकारी बलदेव प्रकाश, उपमहाव्यवस्थापक अलोककुमार चतुर्वेदी, रवी कुमार वर्मा, सहायक व्यवस्थापक सुधा प्रकाश, उप व्यवस्थापक दत्तप्रसाद पवार, प्रताप हंदराले आदी उपस्थित होते. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने व प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांचे व खासदार जलील यांचे स्वागत केले.

याविषयी डॉ. नाईकवाडे म्हणाले, ‘बँकेने महापालिकेला दहा लाख रुपये निधी दिला आहे. या निधीतून प्राणिसंग्रहालयात नागरिकांसाठी सुविधा निर्माण व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्या, बाक लावणे, रेस्टिंग शेड उभारणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, वाघांच्या पिंजऱ्यात मचाण बांधणे, रंगरंगोटी करणे आदी कामांचा समावेश असावा अशी सूचनाही केली आहे. येत्या काळात प्रशासनाकडून तशी कामे केली जाणार आहेत.’

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!