Share

औरंगाबादेतून चाेरी झालेल्या कारमध्ये मनसुख हिरेनची हत्या, एटीएसच्या अधिकाऱ्याचा दावा

Published On: 

मुंबई : अँटिलिया स्फोटकेप्रकरणाशी रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. स्फोटकासंबंधित मनसुख हिरेन या ठाण्यातील व्यापाऱ्याची हत्या औरंगाबादमधून चोरलेल्या गाडीमध्ये झाली होती, असा दावा एटीएसच्या एका अधिकाऱ्याने केला आहे.

एनआयएच्या आधी हिरेन हत्याकांडाचा तपास एटीएसकडे होता. या पथकामध्ये या अधिकाऱ्याचा समावेश होता. या गाडीसोबतच आणखी एक गाडीही दिसली होती. ४ मार्च रोजी ही गाडी निलंबित एपीआय सचिन वाझे चालवत होता असा संशय आहे. त्याच्या एका दिवसापूर्वी हिरेनचा मृतदेह मुंब्रा खाडीत आढळला होता. विशेष म्हणजे या गाडीचा अद्यापही तपास लागलेला नाहीये. बहुतेक ती गाडी नष्ट करण्यात आली असावी, असे अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे सहकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रियाझुद्दीन काझी यांना निलंबित करण्यात आलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएनं काझी यांना अटक केल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. उद्योजक मुकेश अंबानी सुरक्षा प्रकरणी, वाझे यांना अटक केल्यानंतर आतापर्यंत तीन पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून, त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे.

काझी हा २०१० च्या पीएसआय बॅचमधील पोलीस अधिकारी आहे. त्यांची पहिली पोस्टिंग वर्सोवा पोलीस ठाणे येथे करण्यात आली होती.पोलीस उपनिरीक्षक पदावरून सहायक पोलीस निरीक्षक पदी बढती मिळाल्यानंतर काझीची सीआययू पथकात नियुक्ती करण्यात आली. ९ जूनला सचिन वाझेने सीआययु पथकाचे प्रभारी म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हापासून काझी हा वाझेसोबत काम करीत होता. त्याच्या जवळचा साथीदार म्हणून त्याची ओळख होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!