Share

कोरोना अलर्ट! जालना; ८६४ नवे रुग्ण, सात जणांचा मृत्यू

Published On: 

जालना: कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. या आजाराचा आता जिल्हाभरात फैलाव झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयासह खासगी दवाखानेही फुल्ल झाली आहेत. त्यातच मंगळवारी चोवीस तासांत ८६४ रुग्णांची भर पडली आहे. आजपर्यंतचा हा उच्चांक ठरला आहे. तर दिवसभरात सात कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही ६४७६ पर्यंत पोहोचली आहे. आज दिवसभरात ५७२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनाबाधितांमध्येही गेल्या चोवीस तासांत ८६४ नव्या रुग्णांची भर पडली असून त्यात जालना शहरातील २३५ रुग्णांचा समावेश आहे. दररोज वाढत जाणाऱ्या मृत्यूमुळे प्रशासनासह आता लोकांमध्येही धास्ती पसरली आहे.

जिल्ह्यात विशेष करून शहरात कोरोनाची परिस्थिती बिकट बनली आहे. कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता ३३९८२ पर्यंत पोहोचला आहे. चोवीस तासांतील सात जणांच्या बळीने कोरोनाबळींची एकूण संख्या ५८३ पर्यंत गेली आहे. आज दिवसभरात ५७२ बाधितांवर यशस्वी उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यासह एकूण २६ हजार ९२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!