मुंबई : सोमवारी झालेल्या आयपीएलच्या सामन्यात पंजाब किंग्सच्या संघाने राजस्थान रॉयल्स संघाचा ४ धावांनी पराभव करत आयपीएलमधील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. तर राजस्थान रॉयल्सच्या संघाने आखेरच्या चेंडुपर्यंत लढा देत विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. पहिल्या सामन्यातील पराभवातुन सावरण्याआधी राजस्थानच्या संघाला आणखी एक धक्का बसला आहे. त्यांच्या संघाचा महत्वाचा खेळाडू बेन स्टोक्स दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे.
— Cricsphere (@Cricsphere) April 12, 2021
राजस्थान संघाचा दुसरा सामना हा गुणतालीकेत पहिल्या स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपीटलसोबत गुरुवारी आहे. मात्र या सामन्याआधी राजस्थानच्या चाहत्यासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरनंतर आता संघाचा महत्वाचा अष्टपैलु खेळाडू बेन स्टोक्स दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. महत्वाच्या खेळाडुच्या अनुपस्थितीमुळे राजस्थाच्या संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोमवारी राजस्थान रॉयल्सकडून पंजाब किंग्स विरुद्ध खेळताना त्याला ख्रिस गेलचा झेल घेताना दुखापत झाली. या दुखापतीमुळेच त्याला उर्वरित हंगामाला मुकावे लागणार आहे.
Ben Stokes has been ruled out of the IPL following a broken finger in last night's game. ????
He will stay with the Royals and support the rest of the group in the upcoming matches. ????#RoyalsFamily | @benstokes38 pic.twitter.com/WVUIFmPLMJ
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 13, 2021
पंजाब विरुद्धच्या सामन्यातील १० व्या षटकात युवा रियान परागच्या गोलंदाजीवर गेलने फटका मारल्यानंतर चेंडू झेलण्यासाठी लाँग-ऑनला क्षेत्ररक्षण करत असलेला बेन स्टोक्स धावत आला आणि त्याने पुढे झेपावत हा झेल घेतला. मात्र, त्याचवेळी त्याच्या डाव्या हाताला दुखपत झाली. स्टोक्सने या सामन्यात गोलंदाजी करताना एकच षटक टाकले होते. असे असतानाही तो नंतर राजस्थानकडून सलामीला फलंदाजीला आला होता.
महत्वाच्या बातम्या
- जालना; सकाळी उघडलेली बाजारपेठ पोलीस येताच बंद!
- ‘या’ कारणामुळे झाला कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव
- आखेरच्या चार षटकात बदलले सामन्याचे चित्र; मुंबईच्या गोलंदाजानी लढवली खिंड
- पहिल्या विजयानंतर मुंबई इंडियन्सची गुणतालीकेत भरारी; केकेआरची झाली घसरण
- मुंबई इंडियन्सने उभारली विजयाची गुढी ; केकेआरचा १० धावांनी केला पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

