Share

जालन्यात अवैध दारूची विक्री; १५ जणांवर कारवाई

Published On: 

जालना: राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत आहे, त्यामुळे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक कायदा लावण्यात आला आहे. त्यामुळे अवैध धंदे करणारे सरसावले आहेत. अशीच एक घटना जालना येथे समोर आली, दारूची विक्री करणाऱ्या १५ जणांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई १ ते १२ एप्रिलदरम्यान करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी किरण मारोती उप्पलवाड, अर्जुन भीमराव एखनार, रज्जाक शेख उस्मान, सुधाकर मच्छिंद्र कातुरे , कैलास प्रभू राठोेड, चेतन सुरेश जैस्वाल भागवत प्रभू मुळे, योगेश ज्ञानेश्वर कुबेर, विजय कचरू कंकाळ, शुभम अशोक ओताडे, दत्तू तुकाराम घोडके, संतोष भगवान लोखंडे यांच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय उपायुक्त पी. एच. पवार यांच्या सूचनेनुसार अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या पथकाने १ ते १२ एप्रिलदरम्यान जालना शहरासह भोकरदन तालुक्यातील हॉटेल, ढाब्यांवर छापा मारला. पथकाने वेगवेगळ्या १५ ठिकाणांहून देशी दारूच्या १०३४, विदेशी ४४८, बिअर ८४ व गावठी हातभट्टी दारूच्या १४० बाटल्या जप्त करण्यात आल्या. ३ लाख ३१ हजार ५५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!