औरंगाबाद : शहर परिसरात बेकायदेशीर मोबाईल टॉवर उभारण्याचा सपाटा सुरूच असून, नागरिकांनी तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने शनिवारी (दि. ५) सातारा परिसरात कारवाई केली. महापालिकेला असलेल्या सुट्टीचा फायदा घेत हे टॉवर उभारले जात होते. टॉवरचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. मात्र या जागरुक नागरिकांनी तक्रार केली नसती तर हे प्रकरण मनपासमोर आलेच नसते.
सातारा परिसरातील गट क्रमांक १६१ मध्ये अलोक नगर भागात बेकायदा मोबाईल टॉवर उभारले जात असल्याची तक्रार काही नागरिकांनी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांना केली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. पथकाने पाहणी केली असता गायकवाड यांच्या घरावर अनधिकृतपणे टॉवर उभारण्याचे काम सुरु होते.
शुक्रवारी (दि.४) रात्री मोबाईल टॉवरसाठी लागणारे साहित्य आणून ठेवले होते. शनिवार व रविवार (दि.६) सुट्टीचे दिवस असल्याने मोबाईल टॉवर उभारणीचे काम सुरू करण्यात आले होते. त्यानुसार सकाळी ११ वाजता पथकाने मजुरांना काम बंद करण्याच्या सूचना केल्या. तेथील साहित्य जप्त करून पंचनामा करण्यात आला.
बेकायदा बांधकामावर कारवाई
भावसिंगपुरा गावात सातपुते हे घराचे अनधिकृत बांधकाम करत होते. तसेच रस्त्यालगत गॅलरी काढली जात असल्याने ती वाहतुकीला अडथळा ठरणारी होती. त्यामुळे बांधकाम बंद करण्यात आले. ही कारवाई पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, वसंत भोये, इमारत निरीक्षक सय्यद जमशिद अतिक्रमण हटाव पथकातील पोलीस यांच्या पथकाने केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडीकडे समन्वयाचा अभाव’
- सकारात्मक! बीड जिल्ह्यातील कोरोनाचे ३० कोविड सेंटर बंद
- अजितदादा शांत झोपा…आम्हाला सरकार पाडण्यात काडीमात्र रस नाही – संजय काकडे
- औरंगाबादचा विकास थांबला; विकास आराखडा पुन्हा लांबणीवर
- शिवराज्याभिषेक हा महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला सुवर्ण क्षण – उद्धव ठाकरे


