पुणे : महाविकास आघाडी सरकारला १८ महिने बोनसमध्ये मिळाले आहेत. आता लोकं झोपत असताना कधीही सरकार पडेल, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकताच केला होता. देवेंद्र फडणवीस जसे म्हणतात की, दादा झोपेतून उठल्यावर सरकार गेले होते. इतक्या अचानक गेले. केसाने गळा कापणे म्हणतात तसे, तसेच आताही झोपेत असताना सरकार जाईल असे चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत म्हटले होते.
यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे. दरम्यान, अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना पुन्हा डिवचलं. ‘हे सरकार झोपेत असताना पडेल असं चंद्रकांत पाटील म्हटले तेंव्हापासून मी सारखा झोपेतून जागा होतो आणि बघतो सरकार आहे का पडलं,’ असा मिश्किल टोला अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. तसंच, ‘पुन्हा सांगतो जो पर्यंत हे तीन पक्ष एकत्र आहे तोपर्यंत कोणाच्या मायच्या लालमध्ये हे सरकार पडण्याची हिंमत आहे ?,’ असं विधान देखील अजित पवारांनी केलं असून यावेळी त्यांचा पारा देखील वाढल्याचे दिसून आलं होतं.
आता अजित पवारांना भाजप उपाध्यक्ष संजय काकडे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘अजितदादांनी रात्रीची शांत झोप घ्यावी असं दचकून जागं होऊ नये. कारण, महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात भाजपाला बिलकूल स्वारस्य नाही. सध्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश कोरोनामुक्त करण्यासाठी व देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राज्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची कोरोना हीच प्राथमिकता असल्याचे सांगितले आहे. अशा काळात राजकारण करणे योग्य नाही. असे आमचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संस्कार आहेत. त्यामुळे अजित पवार आपण सरकार पडण्यासंबंधी बिलकूल काळजी करू नका. शांतपणे झोपा आणि दिवसभर काम करा. राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवा,’ असा सल्ला देखील संजय काकडे यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत टीम इंडिया उठवणार ‘या’ गोष्टीचा फायदा!
- महाराष्ट्र सावरतोय ; राज्यातील कोरोना रुग्णसंख्येतील घट कायम
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं, अहवालातून धक्कादाय माहिती आली समोर
- लिंब, बेहडा, बांबू, ताम्हणसह औरंगाबाद मनपाने केली १० हजार वृक्षांची लागवड
- कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

