बीड : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट काही दिवसांत पूर्णपणे ओसरण्याची शक्यता आहे. ३० कोविड सेंटर बंद करण्यात आले असून दिवसभरात केवळ २४३ रुग्ण आढळले. शुक्रवारी ३९५८ संशयितांच्या चाचण्या केल्या होत्या. यामध्ये ३७१५ लोकांचे अहवाल निगेटिव्ह आढळले. जिल्ह्याची रुग्णसंख्या आता ८८ हजार १३७ झाली असून शनिवारी ६०४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन कोरोनामुक्तांचा आकडा ८२ हजार ३०४ झाला आहे.
सक्रियरुग्णांची संख्या तीन हजारांच्या खाली गेली आहे. यामध्ये ११९ रुग्ण बाहेर जिल्ह्यात उपचार घेत असून ३२३३ रुग्ण जिल्ह्यात उपचाराखाली आहेत. तर, ६३५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. एकूण बळींचा आकडा आता २०४३ झाला आहे.
दरम्यान गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. त्यामुळे डेंजर झोनमध्ये असलेला बीड जिल्हा आता तिसऱ्या स्टेपमध्ये पोहोचला असून सोमवारपासून अनेक निर्बंध उठणार असल्याने व्यापाऱ्यासह सर्वसामान्य नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. नागरिकांनी निर्बंध उठविले तरी नियमांचे पालन केले तरच यापुढे कोरोनापासून बऱ्यापैकी दिलासा मिळू शकेल.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडीकडे समन्वयाचा अभाव’
- राष्ट्रपतींचे ट्विट हटवल्याने ‘या’ देशात ट्विटरवर बंदी, भारतासोबतही ट्विटरचा वाद सुरू
- बीडमध्ये मराठा आरक्षण मोर्चा; आ.मेटेंसह तीन हजार जणांवर गुन्हा दाखल
- ‘मोदी सरकार श्रेय घेण्यात गुंतल्याने देशात कोरोनाचे संकट गडद’
- ‘सोयाबीन बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करा’, शिवसेना खासदाराचे ‘महाबीज’ला पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

