मुंबई : ६ जून १६७४ ही तारीख महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिली गेली. रयतेला मुघल, आदीलशाही, पोर्तुगीज यांच्यासह इतर परकीय आक्रमणांच्या छळातून मुक्त करण्यासाठी शिवाजी महाराजांनी रायरेश्वराची शपथ घेऊन स्वराज्याची निर्मिती करण्याचा निर्धार केला. आपल्या काही बालमित्रांसह सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये मुक्त वावर असलेल्या हिऱ्यांना ओळखून महाराजांनी मावळ्यांची फौज तयार केली.
अवघ्या मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन गनिमी काव्याने महाराजांनी केलेल्या लढायांमुळे अक्षरश: दिल्लीच्या तख्ताला हादरे बसले होते. अनेक मावळ्यांच्या बलिदानाने त्यांच्या हिंमतीने महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं. हेच ते हिंदवी स्वराज्य ! रयतेचा राजा, आपला शिवबा छत्रपती झाला…तो दिन म्हणजे शिवराज्याभिषेक दिन !
युगप्रवर्तक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्रिवार मुजरा केला आहे. महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला हा सुवर्ण क्षण आहे, असे सांगून त्यानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेकातून रयतेचे आत्मभान जागे केले. जनतेच्या मनातील आणि लोककल्याणकारी राज्य प्रत्यक्षात आणले. रयत आणि मातृभूमी यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. प्रजाहितदक्ष, मुत्सद्दी, धुरंधर शिवरायांच्या पराक्रमाचे तेज आजही आपण अनुभवतो. शिवराज्याभिषेक हा महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला सुवर्ण क्षण आहे. या दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा.
महत्वाच्या बातम्या
- वैजापूरात उभारला जाणार ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प
- राष्ट्रपतींचे ट्विट हटवल्याने ‘या’ देशात ट्विटरवर बंदी, भारतासोबतही ट्विटरचा वाद सुरू
- महाराजांच्या विचारांची अभिमान, स्वाभिमानाची ही पताका आपल्याला कायम फडकवत ठेवायची – अजित पवार
- ‘संभाजीराजेंनी कोणाविरुद्ध व कशासाठी लढायचे ? हे आधी ठरवले पाहिजे’ ; शिवसेना खासदाराचा सल्ला
- नारायण राणेंनी संभाजीराजेंचा आदर्श घेतला पाहिजे ; राऊतांचा टोला


