Share

खळबळ! सचिन वाझे आणखी दोघांचे करणार होता एन्काऊंटर, ‘या’ मोठ्या व्यक्तीचे वाचले प्राण

Published On: 

मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने दोघांचा एन्काऊंटर करण्याचा कट रचल्याचा उलगडा आता एनआयएने केला आहे. १७ मार्च रोजी सचिन वाझेच्या घरावर एनआयएच्या दोन पथकांनी छापा टाकला होता. यावेळी वाझेच्या घरातून एनआयएच्या हाती एका अनोळखी व्यक्तीचा पासपोर्ट लागला होता. एनआयएला संशय आहे की, त्याच व्यक्तीचा एन्काऊंटर करण्याचा वाझेचा कट होता.

सुत्रांच्या म्हणण्यानुसार वाझेच्या कटानुसार या प्रकरणात दोन व्यक्तींचा बनावट एन्काऊंटर करण्यात येणार होता. त्यापैकी एका व्यक्तीची ओळख एनआयएने पटवली असून त्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीच्या जीवाला अजूनही धोका असल्याचे एनआयएच्या सूत्रांनी सांगितले आहे. संबंधित पासपोर्ट सचिन वाझेच्या घरी कसा काय आला? आणि यामागे कारण काय? या प्रश्नांनी एनआयएचे अधिकारी हैराण झाले होते.

पण आता या पासपोर्टमागचे रहस्य समोर आले आहे. हा पासपोर्ट नेमक्या कोणत्या व्यक्तीचा आहे, तसेच ती व्यक्ती कोणत्या राष्ट्राची नागरिक आहे, याबाबतची सर्व माहिती एनआयएच्या हाती लागली आहे. याच पासपोर्टमधील व्यक्तीचा बनावट एन्काऊंटर करण्याचा कट वाझेने आखला होता, अशी माहितीही समोर आली आहे.

मायकल रोडवरील मुकेश अंबानींच्या निवासस्थानाजवळ जिलेटीन कांड्यांनी भरलेल्या हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीचे सर्व आरोप या व्यक्तीवर टाकण्याचा कट सचिन वाझेने रचला होता. पण पोलिसांनी वाझेला अटक केल्यामुळे संबंधित व्यक्तीचा जीव वाचला आहे. याव्यतिरिक्त वाझेच्या घरात एकूण ६२ पिस्तुलाच्या गोळ्या देखील सापडल्या होत्या, याची माहिती यापूर्वीच एनआयएने न्यायालयात दिली आहे. संबंधित बनावट एन्काऊंटर करून प्रकाशझोतात येण्याची योजना वाझेची होती. त्यासाठी वाझेने बनावट एन्काऊंटर करण्यासाठी दोन व्यक्तींची निवड केली होती. त्यातील एका व्यक्तीची ओळख पटली असून दुसरी व्यक्ती नेमकी कोण याचा शोध एनआयएकडून घेण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!