मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले असून यात कोरोनाला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे. ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली दिशाभूल की, त्यांचीच दिशाभूल? असा प्रश्न उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.
या संबंधी उपाध्ये यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘वर्षभरापासून केंद्र सरकारकडून आपत्ती निवारण कायद्याच्या अंतर्गत काम चालू आहे. राज्यात मदत जाहीर करायची आणि त्याची पूर्तता करण्यासाठी केंद्राकडे मागण्या करायच्या. सारे काही केंद्राच्या कुबड्या घेऊनच चालणार असेल तर मग राज्य सरकार नेमके काय करणार? त्यापेक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे लक्ष दिले तर ते राज्याच्या हिताचे होईल.’ केंद्र सरकारच्या वतीने हाफकीनला देण्यात आलेल्या पनवानगीचा देखील त्यांनी उल्लेख केला. त्याच बरोबर, ‘राज्य म्हणून तुम्ही काही जबाबदारी घेणार ? वर्षभरात रूग्णांसाठी बेड का वाढले नाहीत? ॲाक्सिजन साठा का वाढला नाही ? रेमडेसिविर रुग्णालयातून मिळतील ही घोषणा केली त्याची अंमलबजावणी का नाही केली?’ असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहे.
हि मुख्यमंत्री @OfficeofUT यांना केलेली दिशाभूल की त्यांचीच दिशाभूल?
वर्षभरापासून केंद्रसरकारकडून आपत्ती निवारण कायद्याच्या अंतर्गत काम चालू आहे. सोबतचा गेल्या वर्षीचा लॉकडाऊनचा आदेश पाहा.अचानक नैसर्गिक आपत्ती जाहीर करा अशीमागणी करण्याची गरज राज्य सरकारला का वाटली? ..२ pic.twitter.com/jXqmH6UIDd— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 16, 2021
‘कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी एकमात्र महाराष्ट्र राज्य सोडता प्रत्येक राज्यांनी आपापल्या जनतेला अर्थसहाय्य केले आहे. मग महाराष्ट्र सरकारला का शक्य नव्हते. आत्ताही एवढ्या उशीरा मदत करण्याची उपरती झाल्यावर ही मदत करण्यात तांत्रिक अडचण असल्याचे का भासवले जात आहे. हक्काचे पैसे ‘आगाऊ’ देणार आहेत, सहाय्य नाही. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा गोडगोड शब्द वापरून जनतेची दिशाभूल केली आहे. मुळात राज्य सरकार हे विविध योजनांच्या लाभार्थ्यांना ‘आगाऊ’ पैसे देणार आहेत जे की त्यांच्या हक्काचेच आहेत त्याहुन अधिक असे अर्थिक सहाय्य मुख्यमंत्री देत नाहीयेत.’ असेही उपाध्ये यांनी म्हटले आहे.
- खासदार संजय जाधव यांच्याकडून कोरोना रुग्णांसह कुटूंबियांसाठी मदत केंद्र सुरू
- पालघर प्रकरणातील साधूंना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही – कदम
- मुख्यमंत्री फार सौम्य आहेत, त्यांनी कठोर पावलं उचलली पाहिजे – संजय राऊत
- मला हाफकिनचे सामर्थ्य माहित आहे; जितेंद्र आव्हाडांनी मानले पंतप्रधानांचे आभार !
- ‘कालपर्यंत मुली उचलून आणण्याची भाषा वापरणारे आज साधूंसाठी आंदोलन करतायत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

