Share

गुप्त धनाच्या लालसेपोटी ‘या’ परिसरात उत्खनन

Published On: 

औरंगाबाद : सोयगाव शहरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर जगप्रसिध्द अजिंठा लेणीच्या पर्वत रांगेतील एतिहासिक पुरातण वेताळवाडी किल्ला असुन लाखो रुपये खर्च करुन शासनाने पर्यटन स्थळाची डागडूजी करुन पर्यटनासाठी खुला केला असुन हा किल्ला व त्याचा परिसर ऐतिहासिक – पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. या अजिंठा डोंगर रांगेत असलेला वेताळवाडी किल्लात पुरातन गुप्त धनाच्या शोधासाठी ठिकठिकाणी उत्खनन करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी (ता.१४) उघडकीस आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

सोयगाव तालुका हा मराठवाड्याचे शेवटचे टोक व खान्देश, विदर्भाच्या सीमेलगत तर अजिंठा डोंगर रांगेच्या कुशीत वसलेला असून ऐतिहासिक तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र ऐतिहासिक असलेल्या वेताळवाडी किल्ल्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वेताळवाडी किल्ला हा हळदा घाटाला लागून असल्याने निसर्गाच्या विविधतेने नटलेला हा किल्ला बघण्यासाठी पर्यटकांची वर्दळ या किल्ल्यावर नेहमी पहायला मिळत आहे.

मात्र या किल्ल्याचा चौकीदार हा किल्ल्यात उपस्थित राहत नसल्याने किल्ला बघण्यासाठी येणाNया पर्यटकांच्या नोंदी होत नसल्याने दारू पिणाNयांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पाणी, थंड पेयच्या बाटल्या व दारूच्या बाटल्या पडलेल्या असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तर पुरातन गुप्त धनाच्या लालसेपोटी किल्ल्यात काही ठिकाणी उत्खनन करण्यात आले आहे. पुरातत्व विभाग मात्र निद्रावस्थेत असून पुरातत्व विभागाच्या अधिकाNयांच्या दुर्लक्षामुळे किल्ल्याची सुरक्षा धोक्यात येऊन किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पुरातत्व विभागाने किल्ल्याच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे व किल्ल्याची स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी गडकिल्ले प्रेमींनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!