Share

स्मार्ट सीईओचा पदभार घेताच मनोहरे ‘क्वारन्टाइन’, वादाचा नवा अंक सुरू?

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : नगर विकास विभागाने १ फेब्रुवारी रोजी स्मार्ट सिटीच्या सीईओ पदावर बाबासाहेब मनोहरे यांची नियुक्ती केली होती. त्यानुसार नगरविकास मंत्रालयाकडून मिळालेल्या तातडीच्या सूचनांनुसार त्यांनी २२ फेब्रुवारी रोजी स्मार्ट सिटी सीईओ पदाचा कार्यभार स्विकारुन कामकाजास सुरुवात केली. स्मार्ट सिटीच्या बांधकामाची पाहणी करत त्यांनी कामाचा श्रीगणेशा केला खरा मात्र त्यानंतर तीनच दिवसात ते रजेवर गेल्याची माहिती मिळत आहे. पदभार स्विकारताच मनोहरे क्वारन्टाईन झाल्यामुळे स्मार्ट सिटीच्या वादाचा हा नवा अंक तर नाही ना? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.

महापालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पांडेय स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे काम पाहत असतांना राज्य शासनाने स्मार्ट सिटीच्या सीईओ पदावर मुख्याधिकारी संवर्गातील बाबासाहेब मनोहरे यांची नियुक्ती केली. मात्र या नियुक्तीवर आयुक्त पांडेय यांच्यासह सर्वच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. स्मार्ट सिटीच्या रखडलेल्या कामांनी पांडेय यांच्या काळात वेग धरला होता. अनेक अडथळे दूर करून मनपा प्रशासकांनी कामे सुरू केली होती. मात्र मनोहरेंच्या येण्याची धास्ती घेत अनेकांनी साम-दाम-दंडभेदाचा वापर करत हि नियुक्ती रद्द करण्याचा प्रयत्न केला. मात्र मनोहरे अखेर रुजू झालेच.

बाबासाहेब मनोहरे रुजू झाले त्यादिवशी पांडेय यांनी त्यांना औपचारिकरित्या पदभार देणे आवश्यक होते. मात्र तब्येतीचे कारण पुढे करत त्यांनी त्यादिवशी रजेवर जाणे पसंद केले. पांडेय आणि मनोहरे यांची समोरासमोर भेट आजपर्यंत झालेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. रुजू झाल्यानंतर मनोहरे यांनी कामास सुरुवात केली मात्र चौथ्याच दिवशी २६ फेब्रुवारी रोजी ते रजेवर गेले आहेत.

मी क्वारन्टाईन झालो आहे, अशी माहिती मनोहरेंनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलतांना दिली. मात्र कामाला सुरुवात केल्यानंतर अचानकच क्वारन्टाईन होण्यामागचे कारण मनपा प्रशासक तसेच शहरातील शिवसेनेचे नेते तर नव्हे ना? असा सवाल अनेकांकडून उपस्थित होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!