🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यातील वैधानिक विकास महामंडळाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली. राज्यपालांनी 12 सदस्यांची नियुक्ती जाहीर करताच वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करू, असं अजित पवार यांनी सांगितलं.
त्याला फडणवीस यांनी कडाडून विरोध करत दादांच्या पोटातले ओठात आले. हा विदर्भ-मराठावाड्यातील जनतेला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली. विदर्भ-मराठवाड्यातील जनता तुम्हाला माफ करणार नाही. वाटेल तो संघर्ष करू आणि आमच्या हक्काचे घेऊ, आम्ही भिकारी नाही,’ अशी सडकून टीका फडणवीसांनी केली आहे.
यामुळे सभागृहात सरकार विरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसून आले. याच मुद्द्यावरून भाजपने सभात्याग देखील केला. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या आक्रमक अवतारावरून भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.
'एक @Dev_Fadnavis क्या करेगा ?' : @supriya_sule
Ans : तुम्हारे 'दादा' को धो डालेगा ! https://t.co/ER8wVyTbEY— Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) March 1, 2021
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं होतं. ‘एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा ? महाराष्ट्र एक तरफ और देवेंद्र फडणवीस एक तरफ’ अशी टीका त्यांनी केली होती. याच टीकेला आचार्य तुषार भोसले यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. ‘एक फडणवीस क्या करेगा असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, याच उत्तर आहे…तुम्हारे ‘दादा’ को धो डालेगा !’ असा प्रहार भोसलेंनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भारतात सगळ्यात जास्त वाघ विदर्भात, विदर्भाचा अपमान करू नका; वैधानिक मंडळाचा वाद पेटला
- मोदीसाहेब, आता ‘माकडावस्थेत’ जाऊन झाडावरची पान फुल खाऊन जगावं की काय…?
- शिष्यानंतर गुरूचा नंबर ; शरद पवारांनी घेतली कोरोना लस
- “ठाकरी बाणा” खुर्चीसाठी एवढा लाचार होऊ शकतो ?
- ‘अब होगी हलक्रांती’, ४० लाख ट्रॅक्टर घेऊन तयार रहा; टिकैत यांनी दिल्या सूचना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
