Share

अश्विनला सार्वकालिन महान क्रिकेटपटू मानण्यास नकार देणाऱ्या मांजरेकरांचे ‘या’ खेळाडूने केले समर्थन म्हणाले…

Published On: 

मुंबई : काही दिवसापुर्वी संजय मांजरेकरांनी सर्वकालीन क्रिकेटपटुची एक यादी सांगितली. या यादीत डॉन ब्रॅडमन, सोबर्स, गावसकर, तेंडुलकर, विराट या क्रिकेटपटूचा समावेश करण्यात आला. मात्र त्यावेळी मांजरेकरानी अश्विनचा समावेश सर्वोत्तम क्रिकेटपटुच्या यादीत करण्यास साफपणे नकार दिला. यानंतर आर अश्विनने मांजरेकरच्या ट्विटला उत्तर दिले होते.

यानंतर वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज कर्टली एम्बोज यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. आर अश्विनवर संजय मांजरेकरांनी केलेल्या टीकेबद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘सर्वांना स्वत:चे मत असु शकते. त्यामुळे सगळ्यांची याबाबतीत वेगवेगळी मते आहेत. मत व्यक्त करताना महानता ही कोणत्या व्यख्येत बसवतो यावर मत ठरवता येते. प्रत्येकाची महानतेकडे बघण्याची वेगवेगळी शैली असते.’ असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी त्यांची माहानतेची व्याख्या सांगताना जो खेळाडु अनेक वर्षे लयीमध्ये राहतो तो महान खेळाडु ठरतो.

एक किंवा दोन वर्षे लयीत असणाऱ्या खेळाडुंना महान म्हणण्यास त्यांनी नकार दिला आहे. कर्टली एम्ब्रोजने वेस्ट इंडिजसाठी 98 कसोटी सामन्यात 405 गडी बाद केले आहेत. तर 176 एकदिवसीय सामन्यात 225 गडी बाद केले आहे. मांजरेकरांनी अश्विनविषयी आपल्या मताबद्दल स्पष्टीकरण देताना अश्विनने आपल्या कारकिर्दीत एकदाही इंग्लंड, ऑस्ट्रेलिया देशात एका डावात 5 गडी बाद केले नाही असे सांगितले होते. अश्विन आता येत्या १८ ते २२ जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड होणाऱ्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!