Share

परळी औष्णिक विद्युत केंद्राने उभारला ऑक्सिजन प्लांट, पाहणी करतांना ऊर्जामंत्री म्हणाले दर्जेदार सेवा द्या!

Published On: 

बीड: राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा ११ जूनपासून मराठवाडा दौरा सुरु आहे. या दौऱ्यात त्यांनी शुक्रवारी रात्री स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैदयकीय महाविदयालय व रुग्णालय आंबाजोगाई येथे ऊर्जा विभागाच्या अंतर्गत महानिर्मितीच्या परळी वैजनाथ औष्णिक विद्युत निर्मिती ‘परळी टी पी एस’ केंद्रातर्फे उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन प्लांटची पाहणी केली. या वेळी, वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार विदयुत सेवा देण्याच्या सुचना त्यानी महावितरण अधिकाऱ्यांना केल्या.

ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. नितीन राऊत यांच्या हस्ते आधी बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास मालार्पण तसेच अभिवादन करण्यात आले. यावेळी तिथे उपस्थित अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या. राऊत म्हणाले, वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार विदयुत सेवा द्या, आशा सूचना त्यांनी तेथील महावितरण अधिकाऱ्यांना दिल्या.

आंबाजोगाई येथील ऑक्सीजन प्लांटच्या उभारणीबदल त्यांनी रुग्णालय व्यवस्थापन आणि ऊर्जा विभागांच्या अधिकाऱ्यांचे कौतुक देखी केले. यावेळी त्यांच्या समवेत आमदार संजय दौंड, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, महावितरणच्या लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रविंद्र कोलप, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, कार्यकारी अभियंता संदीप चाटे आदी अधिकारी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!