Share

Manisha kayande | “संजय राठोड यांना मंत्री घोषित केल्यामुळे चित्रा वाघ…” ; मनीषा कायंदे यांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. आज पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. शिंदे गटातील आणि भाजपातील एकूण १८ आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मंत्रिमंडळात एकाही महिला आमदाराला स्थान देण्यात आलेलं नाही. तसेच पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव आलेले संजय राठोड यांनाही मंत्रिपद दिल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यावरुनच आता शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे.

संजय राठोड यांनी शपथ घेतल्यावर चित्रा वाघ यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत त्या म्हणाल्या होत्या कि, “माझा लढा अजून संपलेला नाही. लढेंगे और जितेंगे भी!” यावरच मनीषा कायंदे यांनी भाष्य केले आहे. “संजय राठोडांना मंत्रिपद दिल्याने चित्रा वाघ प्रचंड अस्वस्थ झाल्या आहेत. त्यांनी आकांडतांडव सुरु केले आहे. त्यामुळेच मला त्यांना विचारायचे आहे कि, महिलांच्या सन्मानासाठी संजय राठोड, राहुल शेवाळे, श्रीकांत देशमुख यांच्यासारख्याचं वस्त्रहरण करण्यासाठी आपण एकत्र लढा उभारूया. आहे का तुमची तयारी?”, असे आवाहन मनीषा कायंदे यांनी चित्रा वाघ यांला केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!