Share

दुकानासमोर सापडलेले मंगळसूत्र सराफा व्यापाऱ्यांनी केले पोलिस ठाण्यात जमा

Published On: 

औरंंगाबाद : कासारीबाजार परिसरातील एका दुकानासमोर सापडलेले जवळपास १५ हजार रूपये किंमतीचे मंगळसूत्र दोन युवकांनी सिटीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार यांच्याकडे सुपुर्द केले.

सिटीचौक परिसरातील रहिवासी गिरीश ललवाणी यांची कासारीबाजार परिसरात दुकान असून त्यांना गुरूवारी दुपारी दुकानासमोर एक मंगळसूत्र सापडले. बराचवेळ झाला तरी मंगळसूत्र घेण्यासाठी किंवा शोधण्यासाठी कोणीच न आल्याने त्यांनी ही बाब आपले मित्र राम वारेगावकर यांना सांगितली. गिरीश ललवाणी व राम वारेगावकर यांनी तात्काळ हे मंगळसूत्र सिटीचौक पोलिस ठाण्यात जमा करण्याचा निर्णय घेत त्यावर अंमलबजावणी केली.

दोघांनीही सिटीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार यांची भेट घेवून त्यांना घडलेला घटनाक्रम सांगत दुकानासमोर सापडलेले मंगळसूत्र पोलिस निरीक्षक पवार यांच्याकडे सुपूर्द केले. तसेच ज्या महिलेचे मंगळसूत्र आहे तिचा शोध घेवून तिला मंगळसूत्र परत देण्याची विनंती केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!