भोपाळ : देशभरात कोरोनाने थैमान घातले घातले आहे. देशभरात दररोज ३ लाखाहून अधिक रुग्णांची वाढ होत आहे. सध्या देशभर गंभीर झालेली कोरोनाची परिस्थिती सर्वांच्याच संयमाची परीक्षा पाहणारी आहे. या बिकट परिस्थितीमध्ये एका तरुणाचा संयम संपला आणि त्यानं कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती पत्नीच्या उपचारासाठी चक्क ऑक्सिजन असलेल्या अॅम्बुलन्सचं अपहरण केलं.
भोपाळ येथील पुतली घाट भागातील मुखर्जी नगरमधील कुशवाहा कुटुंबात 4 दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलेला ऑक्सीजनची आवश्यकता होती. तिच्या पतीने ऑक्सीजनची व्यवस्थ केली होती. मात्र, घरी अॅम्ब्यूलन्स आली तर तिला रुग्णालयात भरती करता येईल, असे त्याला वाटत होते.
मात्र, रुग्णालयात नव्या रुग्णांना घेत नाही, हे त्याला माहीत होते. त्यामुळे 108 अॅम्ब्यूलन्स त्याच्या घरी पोहचल्यानंतर त्याने ही अम्ब्यूलन्स रोखून धरली. यानंतर 2 तासांनी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी येथे संबंधित व्यक्तीला समजावून सांगितले. यानंतर त्याच्या पत्नीला बंदी बनवून ठेवलेल्या त्याच अॅम्ब्यूलन्सने रुग्णालयात नेवून भरती करण्यात आले. अॅम्ब्यूलन्सचा अटेंडर दीपक याने आरोप केला आहे, की संबंधित महिलेचा पती अॅम्ब्यूलन्सच्या काचा तोडण्याची आणि तिचे नुकसान करण्याचीही धमकी देत होता.
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेचा पती शुक्रवारी रात्री 11 पासून अॅम्बुलन्स घरी पाठवावी अशी विनंती हॉस्पिटलकडं करत होता. त्या रात्री त्याच्याकडं अॅम्बुलन्स आली नाही. दुसऱ्या दिवशी 9.30 वाजता अॅम्बुलन्स घरी पोहचली. त्यानंतर त्यानं अपहरणाचं टोकाचं पाऊल उचललं.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांच्या आवाहनाला ‘या’ कारखान्याचा प्रतिसाद; सुरु करणार ऑक्सिजन निर्मिती
- बीडच्या आडस ग्रामस्थांचा पुढाकार; कोरोनाला रोखण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय
- दुचाकीवर दारूची वाहतूक करणारे दोघे जेरबंद
- विनामास्क फिरणाऱ्यांकडून ५० हजाराचा दंड वसूल
- परळीत ५० बेडचे कोविड केंद्र सुरू


