उस्मानाबाद : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला असून या लाटेत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि इतर आवश्यक औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली असून अनेक रुग्णांना आपला प्राण गमवावा लागत आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारला मदतीची साद घातली असून केंद्राने देखील मदतीचा हात दिला आहे. मात्र, महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज आहे. त्यामुळे आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पुढाकार घेतला आहे.
दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत. पवारांच्या निर्देशांनुसार महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची प्रमुख संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून राज्यातील साखर कारखान्यांना पत्र पाठवण्यात आले आहे.
पवारांच्या आवाहनाला आता प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. साखर कारखान्यामधील इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट प्रकल्प उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यात सुरु करण्यात येणार आहे. धाराशिव साखर कारखाना हा ऑक्सिजन निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट राबवणारा राज्यातील पहिला साखर कारखाना ठरला आहे, अशी माहिती अभिनजीत पाटील यांनी दिली आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास इथेनॉल निर्मिती प्रकल्पात काही बदल करून ऑक्सिजन निर्मिती करता येईल. यामुळे राज्यातील तुटवडा मोठ्या प्रमाणात दूर होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा दुप्पट ऑक्सिजन; फडणवीसांनी मानले मोदींचे आभार
- जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का? – निलेश राणे
- तापसीवरील ‘त्या’ ट्विटनंतर कंगना पु्न्हा ट्रोल
- फिट असूनही कोरोना होतो कसा ? नेटकऱ्यांच्या प्रश्नावर मिलिंद सोमणने दिले हे उत्तर
- ‘काँग्रेसमध्ये काम करणाऱ्यांची किंमत, निष्क्रिय नेत्यांची गरज नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
