औरंंगाबाद : कोरोना विषाणूच्या संसर्ग काळात तोंडाला मास्क न लावता फिरणा-याविरूध्द पोलिसांनी कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. सुरुवातीला मनपाकडून हि कारवाई करण्यात येत होती. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे हे काम पोलीस दलाकडे सोपविण्यात आले. त्यानुसार नाका बंदी आणि विविध ठिकाणी पोलीस कारवाई करत आहे.
शुक्रवारी शहराच्या विविध भागात पोलिसांनी कारवाईची मोहिम राबवत विनामास्क फिरणाNया १०१ जणांकडून ५० हजार ५०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून गर्दी करणा-याविरूध्द विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कारवाईचा बगडा डोक्यावर असताना देखील नागरिक मोठ्याप्रमाणात रस्त्यावर फिरत आहे. पोलीस प्रशासन देखील कारवाई करत असले तरी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अंकिता लोखंडे पुन्हा चर्चेत ; चर्चेचा विषय ठरतोय ‘हा’ व्हिडीओ
- जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का? – निलेश राणे
- तापसीवरील ‘त्या’ ट्विटनंतर कंगना पु्न्हा ट्रोल
- फिट असूनही कोरोना होतो कसा ? नेटकऱ्यांच्या प्रश्नावर मिलिंद सोमणने दिले हे उत्तर
- ‘काँग्रेसमध्ये काम करणाऱ्यांची किंमत, निष्क्रिय नेत्यांची गरज नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

