बीड: जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढतच आहे. तसेच सर्वात सध्या लसीकरण व टेस्ट करणे सुरू आहे त्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यात रुग्णालयातील खाटांची संख्या अपुरी पडत आहेत. त्याच सोबत रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा देखील आपुऱ्य पडत असल्याचे येथील रुग्णालयातून दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर परळीत ५० खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
परळी तालुक्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आरोग्यसह अन्य यंत्रणा कामाला लावून परळी ग्रामीण रुग्णालयात ५० ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरचे रविवारी दि. २५ रोजी धनंजय मुंडे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता उद्घाटन करण्यात आले.
परळी ग्रामीण रुग्णालयात सौम्य ते मध्यम तीव्रतेच्या कोरोना बाधित रुग्णांचे उपचार करता यावेत, यासाठी आवश्यक सामग्री दोन दिवसात उभारण्यात आली असून यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी आवश्यक कार्यवाही पार पाडली. दरम्यान या ५० बेडच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय रुग्णालयात दाखल होणाऱ्या नियमित रुग्णांच्या उपचारांवर कोणताही परिणाम होणार नाही. रविवारपासून येथे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात होणार असल्याचेही डॉ.शेख म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- अवैधरित्या दारू विकणाऱ्या तिघांवर कारवाई
- जीएमसी मृतदेह बेपत्ता प्रकरण; कुटुंबियांनी घेतले उपोषण मागे
- ‘भित्र्या सेलिब्रेटिंनो.. देशाशी प्रामाणिक राहा, सरकारशी नाही’, तेजस्वी यादव संतापले
- परभणीत खासगी डॉक्टर्स कोविड रुग्णांच्या सेवेत दाखल, औषधोपचार होणार गतीने
- खाकीतल्या माणसाचा प्रामाणिकपणा; सापडलेलं सोनं केलं परत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

