औरंंगाबाद : लॉकडाऊन काळात अवैधरित्या देशी दारूची विक्री करण्यासाठी देशी दारूचा साठा दुचाकीवर घेवून जाणा-या दोघांना पोलिसांनी गजाआड केले. प्रविण साहेबराव पंडित (वय ३०), संतोष बाबासाहेब काळे (वय ३४), दोघे रा.ओमसाईनगर, रांजणगांव-शेणपुंजी अशी दुचाकीवर दारूचा साठा घेवून जाणा-यांची नावे आहेत.
दोन इसम चोरट्या मार्गाने दारू विक्री करण्यासाठी घेऊन जाणार असल्याची माहिती, एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळाली. त्या माहितीची खात्री करून पोलिसांनी सापळा लावला. माहिती मधील वर्णनाचे दोघे दिसताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून १ हजार ४०४ रूपये विंâमतीचा देशी दारूचा साठा आणि दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एफबी-८५४४) असा एवूâण ६१ हजार ४०४ रूपये विंâमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैधरित्या देशी दारूचा साठा घेवून जाणा-या दोघांविरूध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अंकिता लोखंडे पुन्हा चर्चेत ; चर्चेचा विषय ठरतोय ‘हा’ व्हिडीओ
- जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का? – निलेश राणे
- तापसीवरील ‘त्या’ ट्विटनंतर कंगना पु्न्हा ट्रोल
- फिट असूनही कोरोना होतो कसा ? नेटकऱ्यांच्या प्रश्नावर मिलिंद सोमणने दिले हे उत्तर
- ‘काँग्रेसमध्ये काम करणाऱ्यांची किंमत, निष्क्रिय नेत्यांची गरज नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

