Share

‘ममता दीदी मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही, भाजपात प्रवेश करून मोठी चूक केली’

Published On: 

कोलकत्ता : गेल्या काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉंग्रेस या पक्षाने भाजपला चारही मुंड्या चीत करून बंगालमधील विधानसभा काबीज केली आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा एकहाती बहुमत मिळवलं असून भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरवून देखील दोन अंकी जागांवरच समाधान मानावं लागलं आहे.

निवडणुकांत नेत्रदीपक विजय मिळविलेल्या ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यानंतर आता काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणाऱ्या माजी महिला आमदाराच्या एका पत्राची सध्या पश्चिम बंगालमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. माजी महिला आमदार असणाऱ्या सोनाली गुहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना पत्र लिहिलं आहे. ‘दीदी तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही. भाजपात प्रवेश करून मोठी चूक केली’ असं म्हटलं आहे.

‘ज्या पद्धतीने मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही, त्याचप्रमाणे दीदी, मी सुद्धा तुमच्याशिवाय राहू शकणार नाही’ असं म्हणत सोनाली गुहा यांनी आपल्याला पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये घेण्याची विनवणी ममता बॅनर्जी यांना केली आहे. तसच ‘भावनिक होऊन मी दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. भाजपात प्रवेश करून चूक केली. पक्ष सोडल्याबद्दल मी आपली माफी मागते. जर आपण मला माफ केलं नाही, तर मी जिवंत राहू शकणार नाही. कृपया मला पुन्हा पक्षात प्रवेश करण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून मी माझं उर्वरित आयुष्य आपल्या सहवासात घालवू शकेल.’ अशी भाविक साद देखील त्यांनी यावेळी ममता बॅनर्जी यांना घातली आहे.

दरम्यान, नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून ममता यांचेच जुने सहकारी आणि भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा अवघ्या 1 हजार 956 मतांनी पराभव केला. बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांना आमदारकी मिळवणं गरजेचं आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी या भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं जात आहे. यांच्यासाठी भवानीपूरचे आमदार आणि कृषीमंत्री शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी राजीनामा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!